|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » न्यायालयातही यामीन पराभूत, मालदीवमधील राजकीय संकट संपणार

न्यायालयातही यामीन पराभूत, मालदीवमधील राजकीय संकट संपणार 

माले

 मालदीवचे मावळते अध्यक्ष अब्दुल्ला यामीन अब्दुल गयूम अध्यक्षीय निवडणूक प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणाऱया खटल्यात पराभूत झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्याने निवडणूक निकाल वैध ठरला आहे.

निवडणूक आयोगाने मतपत्रिकांमध्ये फेरफार केल्याचा आरोप यामीन यांनी याचिकेद्वारे केला होता. मतपत्रिकेत गायब होणाऱया शाईचा वापर करण्यात आला आणि याच्या माध्यमातून मतपत्रिकेवरील आपले नाव पुसले गेल्याचा दावाही त्यांनी केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय खंडपीठाने मतपत्रिकांमध्ये फेरफार तसेच निवडणूक प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप सिद्ध करणारे पुरावे सादर करण्यास यामीन यांना अपयश आल्याचे रविवारी म्हटले आहे. 23 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या निवडणुकीत यामीन हे सोलिह यांच्याकडून पराभूत झाले होते. निकालाचे संयुक्त राष्ट्रसंघ, भारत, चीन आणि युरोपने स्वागत केले होते.

यामीन यांनी प्रारंभी पराभव मान्ये केला, परंतु पुढील काळात त्यांनी मतदानात अनियमितता झाल्याचा आरोप केला होता. यामीन यांनी बुधवारी देशाला संबोधून भाषण केले होते, हे त्यांचे निरोपाचे भाषण असल्याचे मानले गेले होते.

 सुनावणीदरम्यान विरोधी पक्षांचे अनेक समर्थक न्यायालयाबाहेर उभे होते. निर्णय येताच त्यांनी जल्लोष केला आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे सोलिह यांचा अध्यक्षपदाचा मार्ग प्रशस्त झाला असून 17 नोव्हेंबर रोजी ते शपथग्रहण करतील असे मानले जात आहे.