|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » Top News » अहमदनगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; आठ ठार

अहमदनगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; आठ ठार 

ऑनलाईन टीम / अहमदनगर :

पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पारनेर तालुक्मयातील वाडेगव्हाण फाटा येथे सोमवारी सकाळी 5.30 च्या सुमारास हा अपघात घडला.

औरंगाबादहुन पुण्याकडे जाणाऱया ट्रव्हलने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. रामेश्वर वाकचौरे (27), मुबशीर अहमद शेख (29), अश्विनी सुभाष कुलकर्णी (23), सायली कुलकर्णी (24), प्रिया सुनील पाटील (24), मृणाल दिवानजी (25), अतिष पांडुरंग गुरव (24), शितल पांडुरंग गुरव (26), वैजनाथ भास्कर सानप (28), हनुमंत विश्वनाथ राख (20), मनोज शंकर माने (40), उमेश सोनाजी गलांडे (20) ही अपघातातील जखमींची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरू आहे.

Related posts: