|Thursday, November 21, 2019
You are here: Home » Top News » पद्मीनी कोल्हापुरे 14 वर्षानंतर पुन्हा मराठी चित्रपटसृष्टीत!

पद्मीनी कोल्हापुरे 14 वर्षानंतर पुन्हा मराठी चित्रपटसृष्टीत! 

 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सर्वाधिक कमी वयात फिल्म फेअर पुरस्काराची मानकरी ठरत आपल्या अभिनयाद्वारे सशक्त कारकीर्द घडवणारी मराठी अष्टपैलू अभिनेत्री म्हणजे पद्मीनी कोल्हापुरे आशुतोष गोवारीकर यांच्या महत्वाकांक्षी ‘पानिपत’ या हिंदी व शशांक उदापूरकर दिग्दर्शित ‘प्रवास’ या मराठी चित्रपटातून पुन्हा रसिकांच्या भेटीला येत आहेत. यात पद्मीनीच्या प्रमुख भूमिका आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना तिने रसिकांच्या पसंतीचा विचार प्रथम केला. तिने नॉन-ग्लॅमर भूमिका निवडत ‘चिमणी पाखरं’ मधील आईची आव्हानात्मक भूमिका निवडली. व्यक्तिरेखेच्या अंतरंगात शिरून सहज ताबा घेण हीच खरी पद्मीनी कोल्हापुरेंची खासियत आहे. असाच सखोल अनुभव पुन्हा मराठी रसिकांना पहायला मिळणार आहे. त्यांची प्रमुख भूमिका असलेला ‘प्रवास’ हा आगामी चित्रपट सुरु झाला असून त्या ती एका वेगळय़ा भूमिकेत दिसणार आहे. अशोक सराफ यांच्यासोबत त्यांची प्रथमच जोडी जमली आहे. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत झाले आहे.

हिंदी चित्रपटांमध्ये व्यस्त असतानाही त्यांनी त्यांचे पती प्रदीप (टूटू) शर्मा यांच्या मदतीने हिंदी, मराठीसह इतर भाषांमधील चित्रपटांची निर्मिती चालूच ठेवली आहे. नव्या अनुभवी मराठी हिंदी दिग्दर्शकांसोबत काम करताना त्या उत्साही दिसत आहेत.

Related posts: