|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » Top News » ओयोचा हौसिंग रेंटल श्रेणीत प्रवेश

ओयोचा हौसिंग रेंटल श्रेणीत प्रवेश 

 

पुणे / प्रतिनिधी :

ओयो या दक्षिण आशियातील सर्वांत मोठय़ा व जगातील झपाटय़ाने वाढत्या हॉटेल, घरे व राहण्याची दर्जेदार सुविधा यांच्या साखळीने दीर्घकालीन, पूर्णतः व्यवस्थापित हौसिंग रेंटल श्रेणीमध्ये प्रवेश केल्याचे सोमवारी जाहीर केले.

ओयो लिव्हिंग भारतातील तरुणांना व वाढत्या लोकसंख्येला माफक दरामध्ये उत्कृष्ट वास्तव्याचा अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. भारतातील हौसिंगविषयक बदलत्या गरजांसाठी अतिशय समर्पक असलेले, ओयो लिव्हिंग वास्तव्याची पहिलीवहिली पूर्णतः व्यवस्थापित, आरामदायी अशी अत्यंत दर्जेदार सुविधा उपलब्ध करणार आहे. ओयो हॉटेल्स अँड होम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक रितेश अग्रवाल म्हणाले, भारतामध्ये सातत्याने नावीन्य आणण्याचे व वास्तव्याचा जागतिक दर्जाचा अनुभव निर्माण करण्याचे आमचे आश्वासन ओयो लिव्हिंगमुळे प्रत्यक्षात साकारले जाणार आहे. ओयो हा ब्रँड अतिशय लोकप्रिय असून, त्यामुळे आम्हाला पुढील वाटचाल करण्यासाठी मोठी मदत झाली आहे. ओयो लिव्हिंग दाखल करून आम्ही नवी सुविधा देण्याच्या दृष्टीने तयारी पूर्ण केली आहे.

Related posts: