|Thursday, November 21, 2019
You are here: Home » Top News » नगर-पुणे महामार्गावरील अपघातात पाच ठार

नगर-पुणे महामार्गावरील अपघातात पाच ठार 

 

पिंपरी / प्रतिनिधी :

भरधव वेगाने औरंगाबादहून पुण्याकडे जाणा-या लक्झरी बसने लोखंडी सळया घेउन चाललेल्या ट्रकला जोराची धडक दिल्याने बसमधील पाचजण जागीच ठार तर 19 प्रवासी जखमी झाले. नगर पुणे महामार्गावर पारनेर तालुक्मयातील वाडेगव्हाण शिवारात पारनेर फाटयावर सोमवारी पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. लक्झरी चालकास झोप अनावर झाल्याने हा अपघात झाल्याचे अपघातातून बचावलेल्या चेतन शर्मा या प्रवाशाने सांगितले. मृत्यूमुखी पडलेल्या पाच पैकी चौघांची ओळख पटली असून एकाची ओळख पटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास औरंगाबाद येथून निघालेली भावना ट्रव्हल्स या कंपनीची लक्झरी बस एम. एच 14 बी. ए. 9312 औरंगाबाद शहर सोडण्यापूर्वी अनेक ठिकाणी प्रवासी घेण्यासाठी थांबली, मात्र वाळंज वगळता कोठेही प्रवासी मिळाले नाहीत. वाळूंज येथे काही प्रवासी बसल्यानंतर नगर जिह्यात बस आली त्यावेळी चालकाने बसमध्ये डिझेल भरून काही काळ तेथेच घालविला. पुढे नगर शहर ओलांडून ही बस पारनेर तालुक्मयातील वाडेगव्हाण शिवारात आली असता तीने समोर सळया घेन जाणाऱया एम. एच. 12 डी. जी. 4620 ला मागून जोराची धडक दिली.

मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये बसचा चालक अमजद मोहमद युसूफ शेख 52, रा. सिटीझन फुडस, कचेरी रोड जुना जालना, प्रमोद उत्तम मोरे, रा. सायगांव, ता. मेहेकर, जि. बुलढाणा, शेख जमीर शेख अल्ताफ वय 12, त्याचे वडील शेख अल्ताफ अब्ब्बुकर 40 दोघेही रा. औरंगाबाद यांच्यासह एका अनोळखी प्रवाशाचा समावेश आहे. चौथा अनोळखी मृतदेह 30 ते 35 वयोगटातील असून प्रथमदर्शनी तो हिंदू धर्मीय असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. जखमींमध्ये सुरज शशीकांत चव्हाण 23, रा. औरंगाबाद, प्रियंका राजाराम पाटील 26 रा. मेथा व्हिला ब्लॉक नंबर 4, न्यु सांगवी, पुणे, आकाश बबन तरफे 20 रा. बाळापुर, ता. कळमनुरी, जि. हिंगोली, रामेश्वर बळीराम वाकचौरे 29, रा रमाईनगर, वाळूंज, ता. गंगापूर जि. औरंगाबाद, अश्‍विनी सुभाष कुलकर्णी 28, सायली सुभाष कुलकर्णी 23 दोघीही रा. ब्लॉक नं. 3 अष्टविनायक गणपतीच्या पाठीमागे, पन्नालालनगर, औरंगाबाद, मुबशीर अहमद शेख 29, रा. सालीवाडा, पैठण जि. औरंगाबाद, प्रिया सुनिल पाटील 24, रा. ए. 2/1103 पलॉडी अपार्टमेंट बानेर, पुणे, मृणाल दिवानजी 25, रा. औरंगाबाद, प्राची सचिन गोसावी 21, स्नेहा जयकुमार गोसावी 23, सायली संजय पवार 25, अनिष पांडूरंग गुरव 23, शितल पांडूरंग गुरव 26, वैजनाथ भास्कर सानप 28, हनुमंत विश्वनाथ राख 21 रा. बिड, मनोज शंकर माने 40, रा. रहिमतपुर, ता. कोरेगाव,जि. सातारा, उमेश सोनाजी गलांडे 23 रा. औरंगाबाद, किशोर धनराज मुरंबे 45 रा. औसा, जि. लातुर यांचा समावेश आहे. विभागिय पोलिस अधिकारी अरूण जगताप, पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले, पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे, पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार सोने यांच्यासह सुपा व पारनेर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन दिवसभरात पुढील सोपस्कर पुर्ण केले. प्रवासी चेतन शर्मा यांच्या फिर्यादीवरून बसचा चालक मयत अमजद मोहमद युसूफ शेख याच्याविरोधत गुन्हा दाखल केला.

Related posts: