|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मंडलिक कारखान्यात शेती विभागासाठीचे प्रशिक्षण शिबीर संपन्न

मंडलिक कारखान्यात शेती विभागासाठीचे प्रशिक्षण शिबीर संपन्न 

वार्ताहर / मुरगूड

हमिदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना व इफको फर्टीलायझर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने कारखान्याच्या शेती विभागातील कर्मचायांना ऊस पिकासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, योग्य पिक व खत व्यवस्थापन, आंतरपिक पद्धती, कोणती आंतरपिके ध्यावीत व कोणती घेवु नयेत याबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी  एक दिवशीय प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.         

कारखाना कार्यस्थळावर या शिबीराची सुरुवात पाडेगांव येथील ऊस संशोधन केंद्राचे प्रमुख ऊस विशेष तज्ञ डॉ .बी.एस. रासकर यांच्या हस्ते व कीडशास्त्रज्ञ डॉ .डी.एस. पोतदार, कार्यकारी संचालक एन .वाय.पाटील, इफकोचे विजय बुनगे, शेती अधिकारी गोकूळ मगदुम, ऊस विकास अधिकारी पी .एच. पाटील यांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलनाने झाली .

पहिल्या सत्रात डॉ .पोतदार यांनी ऊस लागण पद्धती, ऊस पिकातील द्विदल आंतरपीक महत्व, कोणत्या आंतरपिकामुळे उत्पादनात घट होते . दोन सरीतील अंतर, खत व्यवस्थापन इत्यादी विषयी माहीती सांगितली . दुस्रया सत्रात डॉ .रासकर यांनी आपल्या संशोधनातुन सिद्ध झालेले प्रयोग उदा .

तणनियंत्रणासाठी प्रभावीपणे उपयोगी असणारी तणनाशके, ऊस पिकातील आंतरपिके याबाबत मार्गदर्शन केले . यावेळी द्विदल पिके उदृसोयाबीन, भुईमुग, कुळीथ यासारखी पिके घ्यावीत . तर ऊसाला स्पर्धात्मक ठरणारी ज्वारी, मका यासारखी पिके घेवू नयेत . असे सांगितले .

यावेळी इफको प्रतिनिधी बुनगे यांनी इफको मार्फत उत्पादित होत असलेली उत्पादने उदाः रासायनिक खते, किटकनाशके, तणनाशके यांच्या विषयी मार्गदर्शन केले . तसेच इतर कंपनीच्या तुलनेत कंपनी कमी किंमतीत उत्पादने शेतकऱयांना पूरवठा करण्याचा प्रयत्न करते . याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला .

कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत शेती अधिकारी गोकूळ मगदूम यांनी केले. तर प्रास्ताविक कार्यकारी संचालक एन .वाय. पाटील यांनी केले .सर्व प्रशिक्षणार्थीनी शिबीरातील ज्ञानाचा वापर आपल्या क्षेत्रातील सर्वच शेतकयांना करावा . व जास्त उत्पादन कसे घेता येईल याची माहीती द्यावी असे आवाहन करून ऊस विकास अधिकारी पी.एच. पाटील यांनी आभार मानले .

 

Related posts: