|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » Top News » फटाके फोडण्यासाठी फक्त दोन तास :सुप्रिम कोर्टाचा निर्णय

फटाके फोडण्यासाठी फक्त दोन तास :सुप्रिम कोर्टाचा निर्णय 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

फटाक्यांची  विक्री आणि फटाके फोडण्याच्या निर्णयासंबंधी सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. फटाक्मयांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी लागू करण्यात आलेली नाही. पण ऑनलाइन फटाके विक्रीवर बंदी लावलेली आहे. शिवाय, महत्त्वाचे म्हणजे दिवाळी सणात रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांना फटाके फोडण्यासाठी केवळ दोन तासांचीच वेळ मिळणार आहे. तर नाताळ आणि नवीन वर्षासाठी नागरिकांना रात्री 11.55 ते 12.30 वाजेपर्यंत फटाके फोडता येणार आहेत.