|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » राम मंदिरासाठी मोहन भागवतांचे दगडूशेठ गणपतीकडे साकडे

राम मंदिरासाठी मोहन भागवतांचे दगडूशेठ गणपतीकडे साकडे 

ऑनलाईन टीम / पुणे :

राम मंदिर लवकरात लवकर व्हावे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला अभिषेक करुन साकडे घातले. दगडूशेठ गणपती मंदिरात येण्याची खूप दिवसांपासूनची इच्छा होती असे सांगत गणरायाकडे जे मागितले, ते त्यालाच माहित आहे, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला मोहन भागवत यांनी सदिच्छा भेट देऊन गणरायाची आरती आणि अभिषेक केला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, हेमंत रासने, महेश सुर्यवंशी, सुनिल रासने आदी उपस्थित होते. सकाळी 10 वाजता भागवत हे मंदिरात दाखल झाले. मंदिरातील सभामंडपात सुरु असलेल्या अभिषेकादरम्यान त्यांनी गणरायाकडे सर्वसामान्यांना सुख, शांती, समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली. तसेच राम मंदिर लवकरात लवकर पूर्ण व्हावे असे साकडेही गणरायाकडे घातले. भागवत यांना स्मृतीचिन्ह देऊन ट्रस्टतर्फे सन्मानित करण्यात आले.