|Sunday, September 22, 2019
You are here: Home » उद्योग » एचडीएफसी बँकेला जुलै- सप्टेंबरमध्ये 5,005 कोटीचा नफा

एचडीएफसी बँकेला जुलै- सप्टेंबरमध्ये 5,005 कोटीचा नफा 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

एचडीएफसी बँकेनी जुलै-सप्टेंबर या कालावधीमधील तिमाहीचा अहवाल सादर केला असून यामध्ये बँकेला 5,005.73 कोटी रुपयाचा नफा झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे. हीच आकडेवारी मागील वर्षाच्या तिमाहीत 4,151.03 कोटी झाली होती. तर यंदा बँकेला 21.2 टक्के जादा नफ्याची नोंद करण्यात आली. तर नफ्यात वाढ होत जाऊन 28,215.2 कोटी रुपयावर पोहोचली आहे.

जुलै-सप्टेंबर 2018 मध्ये बँकेच्या ग्रॉस एनपीए 1.33 टक्क्यावर राहिला आहे. एप्रिल-जून या कालावधीत त्याचा दर स्थिरच होता. जुलै-सप्टेंबर 2017 मध्ये हाच दर 1.26 इतक्या पातळीवर असल्याचे दिसून येत आहे. 

व्याजाच्या आयमध्ये 20.6 टक्क्याचा नफा झाला. सरासरी ऍसेट रेट वाढीचे प्रमाण 22.9 टक्के आणि निव्वळ व्याजाचा दर 4.3 टक्क्यांवर राहिला असल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे.