|Thursday, September 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शबरीमला प्रकरणी 13 नोव्हेंबरला सुनावणी

शबरीमला प्रकरणी 13 नोव्हेंबरला सुनावणी 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

केरळमधील शबरीमला देवस्थानात विशिष्ट वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यासंबंधीच्या निकालाच्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 13 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. ही याचिका देवस्थान समितीने सादर केली आहे. मंगळवारी त्यावर प्राथमिक सुनावणी झाली. मात्र हे प्रकरण तातडीने हाती घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. यावर आता 13 नोव्हेंबरला सुनावणी होईल, असे सांगण्यात आले. या मंदिरात महिलांना त्यांच्या वयाचा विचार न करता प्रवेश द्यावा असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. तथापि, या निकालाविरोधात प्रचंड जनक्षोभ उसळला असून 10 त 50 या वयोगटातील महिलांचा प्रवेश भाविकांकडूनच रोखण्यात आला आहे.