|Sunday, December 8, 2019
You are here: Home » leadingnews » विराटचा ‘मास्टरस्ट्रोक’, दस हजारी मनसबदारांच्या पंक्तीत

विराटचा ‘मास्टरस्ट्रोक’, दस हजारी मनसबदारांच्या पंक्तीत 

ऑनलाईन टीम / विशाखापट्टणम :

भारतीय संघाचा कर्णधर विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वात जलद दहा हजार धवांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम केला आहे.वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱया वन-डे सामन्यात विराटने ही कामगिरी केली. सचिनने 259 डावांमध्ये हा टप्पा गाठला होता. मात्र विराटने केवळ 205 डावांमध्ये हा विक्रम केला. पहिल्या सामन्यातील 140 धवांच्या खेळीनंतर विराट कोहलीच्या नावावर 212 एकदिवसीय सामन्यात 204 डावांत 9919 धवा जमा झाल्या होत्या. त्यानंतर आज 81 धवांची भर घालून त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 हजार धवांचा टप्पा पूर्ण केला. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 36 शतके आणि 49 अर्धशतके झळकावली आहेत.

पहिल्या सामन्यात शतक झळकाल्यानंतर कोहलीकडून दुसऱ्या सामन्यात चांगल्या खेळीची अपेक्षा होती. ती अपेक्षा त्याने पूर्ण करत अर्धशतक झळकावले. त्या आधी 44 धवांवर असताना मॅकॉय या गोलंदाजाच्या चेंडूवर कर्णधर विराट कोहली खेळत होता. त्याने टाकलेल्या चेंडूवर कोहलीने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू उंच उडाला पण होल्डरला तो चेंडू झेलता आला नाही. या जीवदानाचा कोहलीने पुरेपूर फायदा घेतला. दहा हजार धवांचा टप्पा पूर्ण करणारा कोहली पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे.

 

Related posts: