|Sunday, February 23, 2020
You are here: Home » उद्योग » ‘बीएमडब्ल्यु’ 16 लाख कार परत मागविणार

‘बीएमडब्ल्यु’ 16 लाख कार परत मागविणार 

आतापर्यंत 30 कारना आग लागल्याच्या 30 घटना

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बीएमडब्ल्यु कंपनीने जगभरात विक्री करण्यात आलेल्या 16 लाख कार परत मागविण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व डिझेल कार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

फायर एग्जॉस्ट यंत्रणेत बिघाड झाल्याच्या कारणामुळे या सर्व कार कंपनी परत घेणार आहे.

जर्मन कार निर्मिती करणाऱया बीएमडब्ल्यु कंपनी जगभरात विक्री करण्यात आलेल्या कार परत घेणार असून बिघाड झालेल्या पार्टमध्ये दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली आहे.

ऑगस्ट 2010 ते ऑगस्ट 2017 या कालावधीत तयार करण्यात आलेल्या कार परत मागविण्यात येणार. 2016 मध्ये प्रथमच फायर एग्जॉस्ट यंत्रणेत बिघाड झाल्याचे निर्देशनास आल्यानंतरच असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर इतर सर्व उत्पादीत करण्यात आलेल्या कारची तपासणी करण्यासाठी कंपनीने आपल्या कार विक्रेत्या एजन्टना कळविले होते.

ऑगस्टमध्ये कंपनीने युरोप आशियातील 4.80 लाख गाडय़ा परत मागविल्या होत्या. त्यात फायर एग्जॉस्ट यंत्रणेत बिघाड झाला होता. म्हणून कंपनीने ग्राहकांची जाहिरपणे माफी मागितली होती.

Related posts: