|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » ‘गोदरेज इंटेरिओ’कडून ‘ट्रान्सपोज’ उत्पादने बाजारात

‘गोदरेज इंटेरिओ’कडून ‘ट्रान्सपोज’ उत्पादने बाजारात 

प्रतिनिधी/ मुंबई

‘गोदरेज इंटेरिओ’ या भारतातील आघाडीच्या फर्निचर सोल्यूशन्स ब्रँडने ठाणे येथे खास स्टोअर सुरू केल्याची घोषणा बुधवारी केली.          या स्टोअरमध्ये ‘ट्रान्सपोज’ या स्पेस-सेव्हिंग श्रेणीतील नवी उत्पादने उपलब्ध केली जाणार आहेत. नव्या उत्पादनांमार्फत गोदरेज इंटेरिओ महानगरे व उपनगर भागांतील लहान आकाराच्या घरांसाठी उपयुक्त, आटोपशीर व आकर्षक फर्निचरची मागणी पूर्ण करेल.

गोदरेज इंटेरिओचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अनिल माथुर म्हणाले की, गोदरेज इंटेरिओने महाराष्ट्रात लक्षणीय ब्रँड रिकॉल व राज्यातील ग्राहक वर्ग याद्वारे सक्षम स्थान निर्माण केले आहे. एका झपाटय़ाने वाढणारे उपनगर असलेल्या ठाण्यामध्ये प्रचंड क्षमता असून या नव्या स्टोअरमध्ये आमच्या उत्पादनांबरोबरच ट्रान्सपोज ही नव्याने दाखल करण्यात आलेली उत्पादनेही उपलब्ध केली जाणार आहेत. नव्याने दाखल केलेल्या जागेची बचत करणाऱया उत्पादनांमुळे आगामी 12 महिन्यांमध्ये 100 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचे आमचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.