|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कोवळया मनावर सुसंस्कार बिंबविण्याची गरज

कोवळया मनावर सुसंस्कार बिंबविण्याची गरज 

बेळगाव प्रतिनिधी

जीवनात यशस्वी व्हावयाचे असेल तर बालवयापासूनच विपुल वाचन केल्यास आयुष्याचे नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. वाचन जाणिवांच्या संवेदना जागे करून वैचारिकता आणि समाजभान निर्माण करते. पण आजची तरूणाई विविध प्रकारच्या वाईट सवयी, व्यसनाधीन वासनेच्या आहारी जाऊन आपलं सुंदर आयुष्य वाया घालवत आहे. यासाठी किशोरावस्थेमध्ये मुलांच्या कोवळया मनावर सुसंस्कार बिंबविण्याची गरज आहे, असे विचार भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्रा. मायाप्पा पाटील यांनी व्यक्त केले.

   चलवेनहट्टी येथे नुकताच ग्रामस्थ व युवक मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. अशोक अलगोंडी व सुरज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पाटील ‘विद्यार्थ्यांच्या जीवनातील यशाचा मार्ग’ या विषयावर  बोलत होते.  अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील होते.

व्यासपीठावर प्रमुख पाहुणे tन ग्रा पं. सदस्य शटु करिबाले, लक्ष्मण बडवाण्णाचे, अशोक पाटील, तानाजी पाटील उपस्थित होते.

प्रा. पाटील यांनी स्वतःचा भविष्याकाळ उज्ज्वल करायचा असेल तर आजच्या पिढीने भूतकाळातील इतिहासात थोडे जाणिवेने डोकावे लागतेच, असे सांगत थोर नेत्यांची उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.

यावेळी प्रा. अशोक अलगोंडी व सुरज पाटील यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी नारायण पाटील, भरमा सनदी, महादेव पाटील, गजानन कलखांबकर, गंगाधर पाटील, विनोद पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन एन. एन. शिंदे यांनी केले. आकाश अलगोंडी यांनी आभार मानले.

Related posts: