|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » पुणे-सिंगापूरदरम्यान 1 डिसेंबरपासून दररोज नानस्टॉप विमानसेवा

पुणे-सिंगापूरदरम्यान 1 डिसेंबरपासून दररोज नानस्टॉप विमानसेवा 

पुणे / प्रतिनिधी :

‘जेट एअरवेज’ या आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणाऱया भारतातील प्रीमिअर कंपनीने पुणे व सिंगापूरदरम्यान थेट विनाथांबा दररोजची विमानसेवा देण्याची घोषणा केली आहे. ही सेवा येत्या 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

या नव्या सेवेमुळे पुण्याहून सिंगापूरला थेट विमानसेवा देणारी जेट एअरवेज ही पहिली एअरलाईन कंपनी ठरणार आहे. पुण्याहून सिंगापूरला पर्यटनासाठी आणि उद्योग-व्यवसायासाठी जाणाऱयांची संख्या मोठी आहे. 2017 मध्ये सिंगापूरला 36 हजारांहून अधिक प्रवासी पुण्याहून आले होते. थेट फ्लाईट नसतानादेखील इतक्मया मोठय़ा संख्येने प्रवासी आलेले पुणे हे भारतातील एकमेव शहर ठरले होते. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊनच ही नवीन सेवा सुरू करण्यात येत आहे. पुणे ते सिंगापूर ही फ्लाईट क्र. 9 डब्ल्यू 22 ही पुण्याहून भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 05.10 वाजता निघेल. सिंगापूरमध्ये ती तेथील स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.15 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात फ्लाईट क्र. 9 डब्ल्यू 21 ही सिंगापूरहून स्थानिक वेळेनुसार रात्री 9.00 वाजता निघेल व पुण्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12 वाजून 5 मिनिटांनी पोहोचेल.

जेट एअरवेजचे जागतिक विक्री व वितरण विभागाचे वरि÷ उपाध्यक्ष राज शिवकुमार म्हणाले, या नव्या फ्लाईटचे सादरीकरण करताना जेट एअरवेजने स्वागतमूल्य म्हणून तिकीट दरांत खास सवलत दिली आहे. परतीच्या प्रवासासह पुणे ते सिंगापूर हे तिकीट इकॉनॉमी श्रेणीसाठी 23,999 रुपये आणि प्रीमिअर श्रेणीसाठी 66,999 इतके ठेवण्यात आले आहे. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना 24 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत बुकिंग करावे लागेल. नवी फ्लाईट 1 डिसेंबर 2018 पासून सुरू होईल. तिकीट दरातील या सवलती प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासासाठीही मिळवता येतील. सिंगापूरमार्गे ब्रिस्बेन, जकार्ता, देनपसार-बाली, फुकेत, क्वालालंपूर, मेलबर्न, नादी, पर्थ, सुरबाया, सिडनी, व दारविन येथे जाणाऱयांना या संधीचा लाभ घेता येईल.