|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » रमेश खोतसह सतरा जणांना मोक्का

रमेश खोतसह सतरा जणांना मोक्का 

प्रतिनिधी /सांगली :

 खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, सरकारी नोकरावर हल्ला, टोळीयुध्द असे 14 गंभीर गुन्हे दाखल असाणारा कवठेमहांकाळ तालुक्यातील पिंपळवाडीचा सरपंच रमेश खोत, शस्त्र तस्करीप्रकरणी नुकताच अटक करण्यात आलेला डफळापूरचा अक्षय पाटील याच्यासह सतरा जणांना अखेर मोक्का लावण्यात आला. कवठेमहांकाळ पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावाला गुरूवारी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी मंजुरी दिली. या कारवाईने कवठेमहांकाळ तालुक्यात फोफावलेली गुन्हेगारी आणि टोळीयुध्दाला मोठा दणका बसला आहे.

 कारवाई करण्यात आलेल्या टोळीमध्ये कठेमहांकाळ तालुक्यातील पिंपळवाडी, आगळगाव, कोंगनोळी आणि अथणी तालुक्यातील संबर्गी येथील गुंडांचा समावेश आहे. कवठेमहांकाळ, अथणी, आगळगाव, हरोली, घटनांदे, इचलकरंजी, लोणारवाडी, कोळा ता. सांगोला आदी ठिकाणी घडलेल्या गंभीर गुन्हय़ामध्ये या टोळीचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. 2012 पासून कार्यरत असलेल्या या टोळीने कवठेमहांकाळ आणि सीमाभागात धुमाकूळ घातला होता. रमेश आप्पा खोत, वय 42,रा.पिंपळवाडी, यागेश श्रीमंत लिंगले वय 28, सुनील यल्लाप्पा लिंगले  वय 24, दिनेश उर्फ बाबू बाळासो राजमाने वय 22  तिघेरी राहणार .कोंगनोळी, दत्तात्रय उर्फ बंडू  मनोहर भुसनूर वय 23,अमित गणपती नाईक, वय वय 22 रा.आगळगाव, विजयकुमार उर्फ अक्षय शंकर पाटील वय 23, रवींद्रनाथ काशिनाथ जाधव उर्फ आर.डी.एक्स,वय 25 दोघेरी राहणार डफळापूर,हंबीरराव विलास खोत रा,पिंपळवाडी, धनाजी सदाशिव माळी रा.विठुरायाचीवाडी, संतोष उर्फ अमर जयराम आटपाडकर,रा. पिंपळवाडी,  पिंटू बळजबळे रा.रत्नापुर ता.जि.विजयपूर, विनोद पाटील रा.संबर्गी ता.अथणी, योगेश खोत रा.पिंपळवाडी, महेश खोत रा.पिंपळवाडी, सद्दामखान शेरखान पठाण, वय 27 रा.कवठेमहांकाळ,विलास खोत रा.संभर्गी ता.अथणी, यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Related posts: