|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मांडवी पुलांवरील वाहतूक तीन दिवस अंशतः बंद

मांडवी पुलांवरील वाहतूक तीन दिवस अंशतः बंद 

प्रतिनिधी /पणजी :

नवीन मांडवी पूल रविवार दि. 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.30 ते 7.30 वा. पर्यंत तर जुना मांडवी पूल सकाळी 7.30 ते 8.30 वा. पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या काळात पुलाची पाहणी आणि डेक लेव्हल्सचे रिकॉर्डींगचे काम हाती घेण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे शनिवार 27 आणि रविवार 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वा. पर्यंत आणि रात्री 11 ते सकाळी 6 वा. पर्यंत नवीन मांडवी पुलाची एक लेन सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी तात्पुरती बंद राहणार. तसेच

सोमवार 29 व मंगळवार 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वा. पर्यंत आणि रात्री 11 ते सकाळी 6 वा. पर्यंत जुन्या मांडवी पुलाची एक लेन सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहीव. याकाळात पुलाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे कळविण्यात आले आहे.