|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » ‘आणि…डॉ.काशिनाथ घाणेकर’मध्ये मराठीतील दिग्गज स्टारकास्ट!

‘आणि…डॉ.काशिनाथ घाणेकर’मध्ये मराठीतील दिग्गज स्टारकास्ट! 

पुणे / प्रतिनिधी :

पुन्हा बहरणार रंगभूमी…अवतरणार सुवर्णकाळ…वायाकॉम-18 स्टुडीओज प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा विलक्षण प्रवास. वायाकॉम18 स्टुडिओज बायोपिक्सच्या उल्लेखनीय सादरीकरणासाठी प्रसिध्द आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर 8 नोव्हेंबर रोजी “आणि …डॉ. काशिनाथ घाणेकर हा सिनेमा रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. वायाकॉम 18 स्टुडीओज प्रस्तुत या चित्रपटाच्या टीमने म्हणजेच सुबोध भावे, सुमित राघवन आणि चित्रपटाचा दिग्दर्शक अभिजित देशपांडे तसेच वायाकॉम18 स्टुडीओज मराठी व कलर्स मराठीचे व्यवसाय प्रमुख निखील साने यांनी नुकतीच पुण्याला भेट दिली.

मराठीमध्ये पहिल्यांदाच डॉ.काशिनाथ घाणेकर यांच्यावर सिनेमा येत असल्याने या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे. चित्रपटाचा विषय, त्यामधील तगडे कलाकार यामुळे चित्रपट बराच चर्चेत राहिलाअसूनहाचित्रपट प्रेक्षकांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे. सुबोध भावे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असून चित्रपटाच्या दोन्ही टीझरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाच्या टीजरला 4.5 लाखापेक्षा अधिक व्हूज मिळाले आहेत. तसेच चित्रपटाच्या टेलरला देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीमध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे अतुलनीय योगदान आहे, यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीला वैभवाचे दिवस आणले. प्रभावशाली संवादफेक, जरब बसणारे डोळे आणि विशिष्ट पद्धतीने बोलण्याची त्यांची शैली अद्वितीय होती. मराठी थेटरमध्ये पहिली शिट्टी वाजली ती डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यासाठी… कधी लाल्या म्हणून तर कधी संभाजी म्हणून प्रेक्षकांच्या मनात त्यांनी अढळ स्थान मिळवले.

ज्यांच्या नावावर तिकीटबारीवर हाउसफुल्लचे बोर्ड लागत होते, असे डॉ.काशिनाथ घाणेकर स्वतःच नाव शेवटी लिहण्याची प्रथा ज्यांनी सुरु केली ते सुध्दा काशिनाथ घाणेकरच! अश्या या मराठीतील सुपरस्टार आणि महान रंगकर्मी डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावरसादर करण्यासाठी वायाकॉम18 स्टुडीओज सज्ज आहेत. हे जबरदस्त व्यक्तिमत्व पडद्यावर साकारत आहे. सगळय़ांचा लाडका आणि अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे तसेच त्यांच्यासोबत असणार आहेत सोनाली कुलकर्णी (सुलोचनादीदी), सुमित राघवन (डॉ.श्रीराम लागू), मोहन जोशी (भालजी पेंढारकर), आनंद इंगळे (प्रा.वसंत कानेटकर), प्रसाद ओक (प्रभाकर पणशीकर), वैदेही परशुरामी (कांचन घाणेकर), नंदिता धुरी (ईरावती घाणेकर), हा सिनेमा 8 नोव्हेंबर रोजी सर्वत्र रिलीज होत आहे.

वायाकॉम18 स्टुडीओज मराठी व कलर्स मराठीचे व्यवसाय प्रमुख, निखिल साने म्हणाले की, मला असं वाटत गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटामध्ये वेगवेगळे विषय येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर वायाकॉम 18 कडून येणारा या वर्षातील आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ‘आणि…डॉ.काशिनाथ घाणेकर’. या चित्रपटाद्वारे डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास या चित्रपटाद्वारे सादर करतोच आहोत, सुंदर स्टारकास्ट देखील आहे. पण सगळय़ात महत्वाची गोष्ट म्हणजे, या सिनेमाद्वारे एककाळ, एक पिढी आम्ही प्रेक्षकांसमोर सादर करणार आहोत.

टेलरद्वारे 1960-80 चा काळ, त्या काळातील वैभव-वाद विवाद, त्या काळातील पात्रं सगळंच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. खऱया अर्थाने ही अशी कथा मांडलेली आहे ज्यामध्ये रंगभूमी वरील पडद्या मागच्या, आणि पडद्यावरच्या लोकांचा खरा प्रवास प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

आपल्या भुमिकेबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला की, मराठी रंगभूमीवर उभं रहाण्याची थोडीशी धडपड करणाऱया माझ्यासारख्या कलावंताच्या आयुष्यात मराठी रंगभूमीच्या पहिल्या सुपरस्टारची व्यक्तिरेखा येण ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. ‘आणि…डॉ.काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाच्या माध्यमातून डॉ.काशिनाथ घाणेकर यांच चरित्र आभ्यासाल मिळालं, त्यांच्याविषयी ऐकायला मिळालं, त्यांच रूप पहायला मिळाल, त्यांनी केलेल्या नाटकातली स्वगत सादर करायला मिळाली, त्यांना जवळून स्पर्श करू शकलो, त्याचबरोबर त्या काळातल्या,त्यांच्याबरोबरच्या अनेक समकालीन ज्ये÷ श्रे÷ दिग्गजांना देखील स्पर्श करू शकलो. मला अस वाटतंया चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही सगळय़ांनी रंगभूमीवरच्या या सर्व मानाच्या शिलेदारांना दिलेली ही आदरांजली आहे, आणि त्यांना केलेला सलाम आहे.

ज्ये÷ अभिनेते श्रीराम लागू यांची भूमिका चित्रपटामध्ये सुमित राघवन साकारणार असून या अनुभवाबद्दल बोलताना म्हणला की, अशा मोठय़ा चित्रपटाचा भाग होणे माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. मराठी नाटक प्रेमींना मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास, तो सुवर्णकाळ तसेच त्या सुवर्ण क्षणांना पुन्हा एकदा बघण्याची संधी या चित्रपटाद्वारे मिळणार आहे. याचबरोबर नवीन पिढीला त्याकाळातील दमदार अभिनेते आणि वैभवशाली रंगभूमीची परंपरा जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. मी स्वतः नाटक आणि रंगभूमीचा चाहता असल्यानेमी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कि, मला ज्ये÷ अभिनेते डॉ.श्रीराम लागू यांची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. यापेक्षा जास्त मी काय मागू शकतो.

सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे म्हणाले की, या सिनेमाच्या निमित्ताने माझ्या हाती एक जुनी संस्कृती लागली. ती म्हणजे मराठी चित्रपट जगातील एकमेव रंगभूमी. ज्यामध्ये आठवडय़ातून सात दिवसात 3 नाटकाचे प्रयोग व्हायचे तो काळ वेगळा होता, ती लोकं वेगळी होती आणि म्हणूनच ती मजा आता पुन्हा रंगभूमीवर उतरावी यासाठी मी या चित्रपटावर 3 ते 4 वर्ष लेखन केले. घाणेकरांवर चित्रपट साकारताना एक जाणवले त्यांचे व्यावसायिक आयुष्य जितके नाट्यमय होते तितकेच ते खाजगी आयुष्यातही नाटय़मय आणि लाघवी होते.