|Monday, December 9, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » ईडी-अर्थ मंत्रालयातही संघर्ष ?

ईडी-अर्थ मंत्रालयातही संघर्ष ? 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱयांमधील वाद न्यायालयात पोहोचलेला असताना अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱयांमध्ये संघर्ष उफाळून आला असल्याचे समोर आले आहे. अतिउच्च पातळीवरून हस्तक्षेप करण्यात आल्यानंतर हे वादळ पेल्यातच निवळल्याचे संकेत आहेत.

ईडीचे सहसंचालक राजेश्वर राव आणि वित्त सचिव हसमुख अढिया यांच्यात हा वाद निर्माण झाला होता. 1998 च्या आपीएस बॅचचे आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले राजेश्वर राव 2007 पासून ईडीमध्ये प्रतिनियुक्तीवर आहेत. ते ओडिशा केडरचे आहेत. तर गुजरात केडरचे 1981 च्या बॅचचे हसमुख अढिया सध्या गुजरात लॉबीचे टॉपचे आणि पंतप्रधानांच्या थेट मर्जीतील अधिकारी आहेत. याच अढियांविरोधात राजेश्वर राव यांनी आठ पानी पत्र लिहून आरोप केल्याने दिल्लीच्या वरिष्ठ वर्तुळामध्ये खळबळ उडाली होती. याचवर्षी 11 जून रोजी हा प्रकार उघडकीस आला होता. राव यांनी अढिया यांच्यावर अनेक घोटाळय़ांची साक्षीदार आणि साथीदार असल्याचा आरोप केला होता. तसेच अधिकार आणि पात्रता असूनही त्यांच्या प्रमोशनला विरोध केल्याचेही म्हटले आहे.

तर राव यांच्याविरोधात एका अज्ञात व्यक्तीने पत्र लिहून त्यांचे दुबईतील एका संशयास्पद व्यक्तीशी संबंध असून काही संभाषण केले असल्याचे सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. परंतु राव यांनी त्याचा इन्कार केला होता. मात्र न्यायालयाने चौकशी सुरुच ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे हे प्रकरण बाहेर आले. ईडीचे महासंचालक करनेल सिंह आणि महसूल सचिव राजेश्वर राव यांना लिहिलेले पत्र अचानक माध्यमांपर्यंत पोहोचल्याने उघड झाले आहे. परंतु आता अतिउच्च पातळीवरुन हे प्रकरण मिटवण्यात आले आहे. तरीही या दोन्ही विभागांमधील संघर्ष उफाळण्याचीच शक्यता वर्तवली जात आहे.

Related posts: