|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सीबीआय कार्यालयासमोर काँग्रेसची निदर्शने

सीबीआय कार्यालयासमोर काँग्रेसची निदर्शने 

प्रतिनिधी/ पणजी

सीबीआय संचालक अलोक वर्मा यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठविल्या प्रकरणी गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी बांबोळी येथील सीबीआय कार्यालयासमोर निदर्शने करून सरकारचा निषेध केला केला. अलोक वर्मा यांना त्वरीत परत कामावर रुजू करून घ्या अशी मागणी करीत त्यांनी घोषणाबाती केली.

गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या सीबीआय कार्यालयातील लाचखोरी प्रकरणाचा तपास सुरु झाला आहे. सीबीआय संचालक अलोक वर्मा तपास कामाला सहकार्य करीत नसल्याचे निमित्त पुढे करून अलोक वर्मा यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवून त्यांच्या पदाचा ताबा नागेश्वर राव यांना देण्यात आला आहे.  याचा निषेध म्हणून काँग्रेस पक्षाने संपूर्ण देशभर असलेल्या कार्यालायंसमोर निदर्शने करून अलोक वर्मा यांना पाठिंबा जाहिर केला असून सरकाराचा निषेध केला आहे. गोव्यातही काँग्रेसने कार्यकत्यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध करून बांबोळी येथील सीबीआय कार्यालया समोर निदर्शने केली व अलोक वर्मा यांना यांना त्वरीत परत घ्या अशी मागणी केली आहे.

गोवा प्रदेश कॉग्रेसचे नेते तसेच विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामात प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, आमदार निळखंड हळर्णकर, फ्रान्सिस सिल्वेरा आलेक्स रेजीनाल्ड विफ्रेड डिसा, क्लापासियो डायस व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी कार्यालयात घूसण्याचा प्रयत्न केला होता मात्र घटनास्थळी मोठय़ा संखेने उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवीले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार दिगंबर कामत म्हणाले की हे प्रकार असेच सुरु राहिल्यास सीबीआय सारख्या केंद्रीय संस्थेवरचा सामान्य जनतेचा विश्वास उडेल. सीबीआयचे संचालक अलोक वर्मा हे राफेल सारख्या महत्वाच्य प्रकरणाचा तपास करीत असताना त्यांना तडकाफडकी सक्तीच्या सुट्टीवर पाठविणे चुकीचे आहे. भाजपा सरकार सध्या मनमानी कारभार करीत असल्याचे कामात यांनी सांगितले.