|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मांद्रे मतदारसंघातून काँग्रेसतर्फे खलप?

मांद्रे मतदारसंघातून काँग्रेसतर्फे खलप? 

प्रतिनिधी/ पणजी

मांद्रे मतदारसंघात आजपासून माजी केंद्रीयमंत्री ऍड. रमाकांत खलप हे झंझावती दौरा सुरू करीत आहेत. अनेक भागात ते कोपरा बैठकांनी काँग्रेसच्या प्रचाराला प्रारंभ करणार आहेत.

यासंदर्भात ऍड. रमाकांत खलप यांच्याशी संपर्क साधला असता यावेळी मांद्रेतील जनता चमत्कार करून दाखवतील. मागच्यावेळी त्यांनी एक चमत्कार केला व आताही तेथील जनता गद्दारांना धडा शिकवेल, असे ते म्हणाले. आमचे उद्दिष्ट आहे 2017 मध्ये मांद्रेवासियांनी काँग्रेसच्या बाजूने जो आतापर्यंतच्या प्रचंड मताधिक्याने दिलेला विजय हा तसाच अबाधित ठेवणे. मांद्रेच्या विकासाच्या तकलादू बाता मारणाऱयांना जनता धडा शिकवील, असे ते म्हणाले.

एका बाजूने विकास झाला म्हणून सांगायचे. आपण विकास केल्याच्या बाता मारायच्या आणि दुसऱया बाजूने विकासासाठी आपण पक्षांतर केले आणि आमदारकीचा राजीनामा दिला असे सांगायचे. मांद्रेतील जनता हुषार आहे. जनता काँग्रेसच्या बाजूने ठामपणे उभी राहिल, असे खलप यांनी सांगितले. 6 वेळा मांद्रे मतदारसंघातून विजयी झालेल्या ऍड. रमाकांत खलप यांचे पारडे सध्या मांद्रे मतदारसंघात जड आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार हे आता दयानंद सोपटे असतील. त्यांच्या पाडावासाठी सध्या मांद्रेमध्ये भाई खलप हे एक अत्यंत तुल्यबळ उमेदवार समजले जात आहेत. मांद्रे मतदारसंघाचा कानोसा घेता दयानंद सोपटे  यांचा पराभव करण्यासाठी केवळ ऍड. रमाकांत खलप हेच मजबूत उमेदवार ठरतात.

ऍड. खलप यांना मांद्रेतील असंख्य कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहानंतर आजपासून भाई खलप हे मांद्रेमध्ये काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ वाढविणार आहेत. कोपरा बैठका घेऊन ऍड. खलप हे जनमत आजमावतील व त्यानंतरच निवडणूक लढविण्याबाबत निर्णय घेतील.

Related posts: