|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » मनोरंजन » रंगकर्मी अरुण नलावडेंच्या दर्जेदार भूमिकांमध्ये तात्यांची भर

रंगकर्मी अरुण नलावडेंच्या दर्जेदार भूमिकांमध्ये तात्यांची भर 

सोनी मराठी वाहिनीवरील ‘भेटी लागी जीवा’ या मालिकेचे वैशिष्टय़े म्हणजे या मालिकेतील कलाकार आणि कथा. तीन पिढय़ा आणि त्यातील प्रमुख पुरुष मंडळी यांच्या नात्यावर आधारित कथा मांडून सोनी मराठीने मालिका प्रेक्षकांसाठी आणली आहे. तीन पिढय़ा, त्यांचे स्वभाव, त्यांची मतं, त्यांचा एकंदर वावर याच्या अवती- भवती फिरणारी भेटी लागी जीवाची कथा मांडली जात आहे. ही कथा तितक्याच सुंदर पद्धतीने यातील तीन पिढय़ांतील प्रमुख पुरुष पात्र साकारणारे कलाकार अरुण नलावडे (तात्या), समीर धर्माधिकारी (विकास) आणि श्रेयस राजे (विहंग) यांनी पडद्यावर सादर केली आहे.

एकापाठोपाठ एक दर्जेदार भूमिका करणारे ज्येष्ठ रंगकर्मी अरुण नलावडे तात्यांच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांच्या पात्राचं वैशिष्टय़ म्हणजे जागोजागी भारूडाचे कार्यक्रम करणाऱया तात्यांच्या वाणीत ऐकू येणाऱया ओव्या आणि त्या ओव्यांभोवती गुंफलेलं तात्यांचं आयुष्य. डिजे-रिमिक्सच्या या काळात गवळण, भारूड, भजन, किर्तनसारखे शब्द कानावर पडणं दुर्मीळचं. मात्र, सध्या सोनी मराठीवर सुरू असलेल्या या मालिकेच्या निमित्ताने कानी पडणारे हे शब्द प्रेक्षकांना खूपच भावत आहेत. त्यात तात्यांकडून या एकंदर नाटय़ाला मिळणारी भारूडाची जोड कौतुकास्पद आहे. केवळ भारूड किंवा किर्तनच नाही तर अरुण नलावडे म्हणजेच तात्यांना दिलेले संवादही तितक्याच ताकदीचे आहेत. हल्लीच्याच एका भागात, आशीर्वादाला ओझं समजून परत करायला आले की काय… म्हणणाऱया तात्यांचे संवाद भाव खाऊन जात आहेत. त्यात मालिकेच्या अनुशंगाने सादर होणारं भारूड प्रेक्षकांना आपल्या मुळांशी घट्ट जोडून ठेवत आहे.

भारूडाशी जोडलेली तात्यांची पिढी, बिझनेस हेच सर्वस्व समजणारा मध्यमवयीन विकास आणि तारुण्याशी नुकतीच ओळख झालेला तरुण म्हणजे विहंग. मुलगा-वडील-नातू अशी ही तीन पिढी, त्यांच्यातील पुरेसा नसणारा संवाद, भावना यावर आधारित या मालिकेतील तिघांच्या नात्यामध्ये पडलेली दरी कशी भरत जाते हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. भेटी लागी जीवा सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता फक्त सोनी मराठीवर प्रसारित होते.

Related posts: