|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Top News » राम मंदिर बांधण्यासाचे अध्यादेश काढूनच दाखवा – असदुद्दीन ओवैसी

राम मंदिर बांधण्यासाचे अध्यादेश काढूनच दाखवा – असदुद्दीन ओवैसी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी राम मंदिराच्या मुद्यावर पुन्हा एकदा टिपण्णी केली आहे. अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी मोदी सरकार अध्यादेश का काढत नाही, प्रत्येक वेळी ते अध्यादेश काढण्याची धमकी देत असतात. तुमच्याकडे सत्ता आहे. मी तुम्हाला आव्हान करतो की, अध्यादेश काढून दाखवा. टॉम, डिक अँड हॅरी असलेल्या भाजपा, आरएसएस, विहिंप अशा धमक्मया देत असतात. असेही ओवैसी म्हणाले आहेत.

मागील काही दिवसांपूर्वीही एमआयएमचे असदुद्दीने ओवैसी यांनी राम मंदिराच्या वादावर टिपण्णी केली होती. राम मंदिर बांधण्यापासून कोण अडवते. त्यांनी अयोध्येत राम मंदिर बांधून दाखवावे. भाजपाला देशात धार्मिक विविधता नको, त्यांना उदारमतवाद नको. भाजपाला देशात एकाधिकारशाही राबवयाची आहे. त्या पक्षाचा विविधता आणि कायद्यावर विश्वास नाही, असेही ओवैसी म्हणाले होते. काही दिवसांपूर्वी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिरच्या मुद्यावर भाष्य केले होते. त्यानंतर ओवैसींची प्रतिक्रिया आली होती. सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते, राम मंदिराच्या उभारणीसाठी सरकारने कायदा करायला हवा. कोणत्याही मार्गाने राम मंदिराची उभारणी व्हायला हवी. मात्र राम मंदिर बांधले गेलेच पाहिजे. केंद्रात सत्ता असतानाही राम मंदिराची उभारणी का केली जात नाही, असा प्रश्न लोकांना पडतो, असेदेखील त्यांनी म्हटले. मतदार केवळ एक दिवसाचा राजा असतो. त्यामुळे त्याने नीट विचार करून मतदान करायला हवे. अन्यथा त्या एका दिवसामुळे पाच वर्षे सहन करावे लागू शकते, असे सरसंघचालक म्हणाले होते.