|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » 81 टक्के भारतीय मोबाईल फीचर्सने असंतुष्ट

81 टक्के भारतीय मोबाईल फीचर्सने असंतुष्ट 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

स्मार्टफोन जगतात भारतीय लोकांच्या वापरासंबंधी गरजात दिवसेंदिवस वाढत आहेत आणि त्यात वाढत्या लोकसंख्येला स्मार्टफोनमध्ये आवश्यक असे फीचर्स उपलब्ध होत नाहीत. मोबाईल उपकरणासंबंधी वेबसाईट 91 मोबाईल्स डॉट कॉमने केलेल्या सर्वेक्षण ‘कंज्युमर इनसाइट्स स्टडी 2018’ नुसार 81 टक्के भारतीयांच्या स्मार्टफोनमध्ये गरजेच्या सुविधा उपलब्ध नाहीत.  

सुविधांच्या समस्येमध्ये एक चतुर्थांश टक्के लोकांना सर्व ब्रँडेड फोनमध्ये बॅटरीची क्षमता कमी असल्याची तक्रार समोर आली आहे. तसेच 20 टक्के लोकांना सॉफ्टवेअरची गती कमी असल्याची समस्या असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर काही लोकांना पॅमऱयाच्या सादरिकरणाबाबत तक्रार केली आहे. वापरकर्तेच्या गरजा आणि प्राथमिकतेला समजण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्यात आले होते असे वेबसाईट 91 मोबाईल्स डॉट कॉमद्वारे सांगण्यात आले आहे.