|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मुख्यमंत्र्यांच्या बैठकांचे चित्रिकरण जनतेला दाखवावे

मुख्यमंत्र्यांच्या बैठकांचे चित्रिकरण जनतेला दाखवावे 

प्रतिनिधी/ पणजी

मंत्रिमंडळ आणि आयपीबी या दोन्ही बैठकांचे मुख्यमंत्र्यांसमवेत चित्रिकरण जनतेला दाखवण्याची तसेच मुख्यमंत्र्यांची आरोग्यविषयक माहिती 15 दिवसांनी देण्याची मागणी काँगेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांनी केला आहे. विधानसभा बरखास्त करण्याच्या आणि लोकसभेबरोबरच विधानसभेचीही निवडणूक घेण्याचे राजकीय गणित आखण्यासाठीच भाजपचा हा वेळकाढूपणा चालल्याची टीकाही त्यांनी केली.

पणजी काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्री. देशप्रभू म्हणाले की पर्रीकर विविध सरकारी आदेश किंवा निर्णयावर तसेच फाईलवर सही करू शकतात काय? हा प्रश्न आहे. फेब्रुवारी 2018 पासून ते आजारी आहेत. तत्पूर्वी त्यांनी केलेल्या सहय़ा आणि त्यानंतर आतापर्यंत केलेल्या सहय़ा यांची पडताळणी करणे आवश्यक आहे. कारण त्यांची सही ठोकून ओएसडी किंवा इतर अधिकाऱयांनी आदेश काढले. असा संशय श्री. देशप्रभू यांनी प्रकट केला.

पर्रीकर हे केवळ त्यांच्या कुटुंबाचे मुख्यमंत्री नाहीत तर ते गोव्याचे आणि जनतेचे मुख्यमंत्री असल्याचे त्यांच्या आरोग्याची माहिती जनतेला देणे हे सरकारचे आणि प्रामुख्याने आरोग्यमंत्र्यांचे कर्तव्य आहे. पर्रीकरांना कॅन्सर झालाय हे शेवटी आरोग्यमंत्र्यांना सांगावे किंवा कबुल करावे लागले. पर्रीकर जर हयात आहेत तर त्यांचे श्राद्ध घालण्याची गरज नाही असे सांगून त्यांच्या आरोग्याची माहिती मिळवण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचा पुनरूच्चार देशप्रभू यांनी केला. त्यासंदर्भात वकीलाशी सल्लामसलत चालू असल्याचे ते म्हणाले. फेब्रुवारीपासून मुख्यमंत्री आजारी असताना आतापर्यंत त्यांचा आजार लपवून ठेवून सरकारने तसेच आरोग्यमंत्र्यांनी जनतेची दिशाभूल केली असा आरोपही श्री. देशप्रभू यांनी केला.

Related posts: