|Saturday, February 29, 2020
You are here: Home » उद्योग » चार चिनी कंपन्यांनी कमाविले 51 हजार कोटी

चार चिनी कंपन्यांनी कमाविले 51 हजार कोटी 

भारतीय मोबाईल बाजारपेठ   4 चिनी कंपन्यांचे राहिले वर्चस्व

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2017-18 आर्थिक वर्षात चीनच्या 4 कंपन्यांनी भारतात स्वतःचे स्मार्टफोन विकून 50 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न प्राप्त केले आहे. श्याओमी, ओप्पो, व्हिवो आणि हुवाई यांनी मागील आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाचा तपशील रजिस्ट्रार ऑफ कंपनीजला (आरओसी) दिला आहे.

2017 मध्ये या 4 कंपन्यांनी भारतातून एकूण 26,262.3 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले होते. 2017 च्या तुलनेत 2018 आर्थिक वर्षात या कंपन्यांनी 25,460 कोटी रुपयांनी अधिक म्हणजेच 51,722 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे.

ऍपल इंडियाने 12 टक्क्यांच्या वृद्धीसह 13,098 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले. तर  गुगल इंडियाने 9337 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले.

चिनी कंपन्यांना पसंती का?

स्वस्त : चिनी स्मार्टफोन्स स्वस्त असणे त्यांच्या भारतातील लोकप्रियतेचे सर्वात मोठे कारण आहे. आज भारतीय बाजारपेठेत बजेट फोनपासून मिड-रेंज आणि प्रीमियम शेणीच्या प्रत्येक वर्गवारीत चिनी कंपन्यांचे  शेकडो फोन उपलब्ध आहेत.

उत्तम वैशिष्टय़े : चीनच्या स्मार्टफोन्समध्ये कमी किमतीत वापरकर्त्याला महागडय़ा फोनमधील सुविधा मिळतात. सध्या सर्वात लोकप्रिय असलेले फीचर फेस अनलॉक चिनी कंपन्यांच्या 5-6 रुपयांच्या मोबाईलमध्ये देखील मिळते.

ब्रँड इमेज : चिनी कंपन्यांनी स्वतःची ब्रँड प्रतिमा तयार केली असल्याने त्यांना अत्यंत पसंती मिळत आहे. आता चिनी कंपन्यांच्या मोबाईलला देखील ब्रँडप्रमाणे पाहिले जात असल्याचे दिसून येते, पूर्वी असे चित्र निश्चितच नव्हते.

तंत्रज्ञान : चिनी कंपन्या स्वतःच्या स्मार्टफोनमध्ये ज्या तंत्रज्ञानाचा वापर करतात, त्याचा वापर दिग्गज कंपन्या देखील करत नाहीत. तर ऍपल-गुगलच्या स्मार्टफोमध्ये जर कोणत्याही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असेल तर त्याची किंमत देखील अधिक असते.

Related posts: