|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » leadingnews » अभिनेते अनुपम खेर यांचा एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

अभिनेते अनुपम खेर यांचा एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा 

ऑनलाईन टीम / पुणे :

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली. व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांनी हा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईत मंगळवारी एफटीआयआयच्या सोसायटीची बैठक झाली होती. अनुपम खेर देखील या बैठकीला उपस्थित होते. बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी खेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दीड वर्षापासून रखडलेली एफटीआयआय सोसायटीची बैठक काल मंगळवारी पार पडली. या बैठकीला अनुपम खेर यांच्यासह नियामक मंडळाचे नवनियुक्त उपाध्यक्ष बी. पी. सिंग, अभिनेत्री दिव्या दत्ता, प्रा. अर्चना राकेश सिंग, संचालक भूपेंद्र कॅन्थोला आदींची उपस्थिती होती. या बैठकीत धोरणात्मक विषयांवर चर्चा झाली. तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही चर्चा करण्यात आली. नियामक मंडळ आणि विद्या परिषद स्थापण्यात आली असून अभिनेते सतीश कौशिक यांची संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. गजेंद्र चौहान नंतर अनुपम खेर यांनी ऑक्टोबर 2017मध्ये त्यांनी एफटीआयच्या अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली होती.

 

Related posts: