|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » मीनाक्षी मल्होत्रा मिसेस महाराष्ट्र 2018

मीनाक्षी मल्होत्रा मिसेस महाराष्ट्र 2018 

पुणे / प्रतिनिधी

‘जॅझमाटाझ’ तर्फे मिसेस महाराष्ट्र 2018, सिजन-3 ही सौंदर्यस्पर्धा नुकतीच मोठय़ा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, कराड, मुंबई आदी विविध भागातील 300 हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामध्ये ‘मीनाक्षी मल्होत्रा’ यांनी मिसेस महाराष्ट्र 2018 हा किताब पटकवला, अशी माहिती पत्रकार परिषदेत बुधवारी मंजूषा पाटील यांनी दिली. याप्रसंगी विजयी स्पर्धक मीनाक्षी मल्होत्रा उपस्थित होत्या.

ही स्पर्धा रविवारी येथील रेसिडेन्सी क्लबमध्ये पार पडली. यामध्ये उंची, व्यक्तीमत्व, आत्मविश्वास, रॅम्पवॉक, इच्छाशक्ती, संवाद कौशल्य व परिक्षकांनी दिलेले गूण हे निकष लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली. स्पर्धेप्रसंगी परिक्षक म्हणुन हेमा कोटणीस (मिसेस इंडिया), मंजुषा मुळीक (मिसेस महाराष्ट्र 2017), व शुभांगी शिंत्रे (मिसेस इंडिया इंटरनॅशनल) उपस्थित होत्या. विजयी स्पर्धक मीनाक्षी यांचे सध्या वय 58 असुन त्यांना तीन मुले देखिल आहेत.

यावेळी मिनाक्षी यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, ‘या स्पर्धेमुळे मला बरच काही नविन शिकायला मिळाल. माझ्या वयाची चिंता न करता, घरच्या व मित्रमंडळींच्या पाठिंब्यामुळेच मी ही स्पर्धा जिंकले आहे.’