|Sunday, September 22, 2019
You are here: Home » Top News » ऍपलकडून iPod Pro प्रदर्शित

ऍपलकडून iPod Pro प्रदर्शित 

ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :

ऍपलने मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये आयोजित शानदार सोहळय़ात आयपॅड प्रोचे दोन व्हेरिअंट प्रदर्शित केले. आतापर्यंतचे सर्वात कमी जाडीचे iPad Pro 11 इंच आणि iPad Pro 12.9 हे दोन आयपॅड लाँच केले असून विशेष बाब म्हणजे यात कंपनीने फेस आयडी टेक्नॉलॉजीचा सपोर्ट दिला आहे. सोबतच बेजल, एनिमोजी, ए12एक्स प्रोसेसर, यूएसबी टाईप सी पोर्ट देखील दिला आहे.

आयपॅड प्रो 11 आणि 12.9 इंच अशा दोन व्हेरिअंटमध्ये लिक्विड रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच ऍपलची अद्ययावत प्रोसेसर A12X बायोनिक चिप देण्यात आली आहे. अमेरिकेसह अन्य देशांमध्ये या आयपॅडची विक्री 7 नोव्हेंबर पासून सुरु होईल. भारतामध्ये हा आयपॅड येण्यासाठी या वर्षाच्या शेवटाची वाट बघावी लागणार आहे. 11 इंचाच्या आयपॅडची किंमत 71,900 रूपये आणि 12.9 इंचच्या आयपॅड प्रो ची किंमत 89,900 रुपये आहे. आयपॅडमध्ये पहिल्यांदाच होम बटन हटविण्यात आले आहे. स्क्रीन साईज वाढविण्यासाठी हे करण्यात आले आहे. या आयपॅडची जाडी केवळ 5.9mm आहे. सोबतच आयपॅड प्रो मध्ये पहिल्यांदाच ड्युअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये आयफोन Xs सारखेच एक नॅनो सिम आणि दुसरे eSIM देण्यात आले आहे. भारतात सुरुवातीला रिलायन्स जिओ आणि एअरटेलकडून ही सुविधा दिली जाणार आहेत. आयपॅड प्रोमध्ये 12 मेगापिक्सल चा रेयर कॅमेरा दिला आहे. ज्यामध्ये 4के व्हिडीओ रेकॉर्डिंग सपोर्ट आहे. यामध्ये 7 मेगापिक्सलचा प्रंट कॅमेरा दिला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे यामध्ये कंपनीने 10 तास बॅटरी बॅकअपचा दावा केला आहे. यासोबत 18 वॉटचा चार्जर दिला असून पॅडमध्ये 4 स्पीकर्स आहेत. या आयपॅडसोबत iPad Pro ची वेगळी पेन्सिल-2 असून पेन्सिलची किंमत 10,900 रुपये ठेवण्यात आली आहे.

iPad Pro ची वैशिष्टये

– 12 मेगापिक्सलचा रेयर कॅमेरा, 7 मेगापिक्सलचा प्रंट कॅमेरा

– आयपॅडमध्ये पहिल्यांदाच होम बटन हटविले

– अद्ययावत प्रोसेसर A12X बायोनिक चिप

– 8 वॉटचा चार्जर, 4 स्पीकर्स

-फेस आयडी टेक्नॉलॉजीचा सपोर्ट

– 10 तास बॅटरी बॅकअपचा दावा

– पहिल्यांदाच ड्युअल सिम सपोर्ट