|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » उद्योग » दिवाळीसाठी टायझर ब्रँडच्या नाविन्यपूर्ण श्रेणी

दिवाळीसाठी टायझर ब्रँडच्या नाविन्यपूर्ण श्रेणी 

‘कम्फी स्ट्रेच शर्ट’ची खास श्रेणी

मुंबई

स्टायलिश व ब्रँडेड कपडय़ांसाठी लोकप्रिय ठरलेल्या ‘टायझर ब्रँड’ने खास दिवाळीनिमित्त नाविन्यपूर्ण श्रेणी सादर केली आहे. यामध्ये खासकरून ‘कम्फी स्ट्रेच शर्टस्’ आकर्षण ठरणार आहे. हे शर्टस् खांदे, हात, कोपरे, पोट किंवा पाठीच्या जागी स्ट्रेच  होणारे असून. त्यामुळे ‘कम्फी स्ट्रेच’ मधील सर्व कपडे हे कम्फर्टेबल आणि स्ट्रेचेबल आहेत. तरुणाईसाठी स्लीम फिट शर्टस् इंटेलिस्ट्रेच तसेच अत्यंत स्टाईलीश असून दिवाळीसाठी फ्रेश कलर्समध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

बेस्ट क्वॉलिटी, स्टाईलीश लूक आणि योग्य किंमत ही टायझरची वैशिष्टय़े आहेत. ‘कम्फी स्ट्रेच’ या श्रेणीमध्ये ग्राहकांना शर्टस्शिवाय टाऊझर्स ही उपलब्ध असून यात पायांना व विशेष करून कमरेलाही स्ट्रेच मिळतो. सर्व वयोगटातील युवकांचा ‘टायझर’ला महाराष्ट्रात उदंड प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या वर्षातच टायझरने 5 लाखाहून अधिक कपडय़ांची विक्री केली आहे. यावर्षी      
 पॅशन व लूक सोबतच कम्फी स्ट्रेचमध्ये कम्फर्टचाही विचार केल्यामुळे तरुणांची ही दिवाळी ‘कम्फी स्ट्रेच’ होणार असल्याचा विश्वास ‘टायझरचे संचालक कुणाल मराठे यांनी व्यक्त केली आहे.

‘टायझर’चे पुणे, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक व नागपूर इ. शहरात 50 शोरुम्स आहेत. या शोरुम्सद्वारे ग्राहकांना एक्सचेंजची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. येणाऱया काळात विदर्भ, मराठवाडा शोरुम्सची संख्या 100 करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मराठे यांनी सांगितले.

Related posts: