|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » रक्तदान करुन आर.टी.ओ. च्या आडमुठय़ा धोरणाचा निषेध

रक्तदान करुन आर.टी.ओ. च्या आडमुठय़ा धोरणाचा निषेध 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

लर्निंग लायसन्सचा कोठा 180 वरुन 60 वर आणला आहे तर हेवी लायसन्सच्या टेस्ट चार महिन्यापासून बंद केल्या आहेत. याचा मोटार ड्रायव्हिंग स्कूलवर परिणाम झाला आहे. यामुळे आर.टी.ओ कार्यालयाच्या आडमुठय़ा धोरणाच्या निषेधार्थ असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबीर आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले.

लर्निग लायसन्स व परमनंट लासन्सचा रोजचा अपॉईटमेंट कोटा 180 वरुन 60 केला आहे. हेवी लायसन्सच्या टेस्ट चार महिन्यापासून बंद आहेत. त्यासाठी लागणारे कीट ड्रायव्हिंग स्कूल बसवर बसवले तरी त्याचा रिपोर्ट करायला आर.टी.ओ. इन्स्पेएकटरना वेळ नाही. आर.टी.ओ कार्यालयाच्या या धोरणाचा फटका ड्रायव्हिंग स्कूललाही बसला नाही. यामुळे ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या वतीने या धोरणाचा निषेध म्हणून आर.टी.ओ कार्यालयासमोर रक्तदान शिबीर आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले. सीपीआर ब्लड बँकेच्या सहकार्याने राबवलेल्या रक्तदान शिबीरात 32 बाटल्या रक्तसंकलन झाले. या आंदोलनात असोसिएशनचे अध्यक्ष  सुनिल घाटगे, उत्तम पाटील, कालीदास देशमुख, जगदीश हिरेमठ, सुनिल मोरे,अशोक पाटील, उदय देसाई,सागर माळी यांच्यासह असोसिएशनचे सदस्य सहभागी झाले होते.

Related posts: