|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फॉर्मेलिनची न्यायालयिन चौकशी करावी

फॉर्मेलिनची न्यायालयिन चौकशी करावी 

गोंयचो आवाज’ संघटनेची मागणी

प्रतिनिधी/ पणजी

 फॉर्मेलिन सारख्या गंभिर विषयाकडेही सरकार गंर्भियाने लक्ष देत नसल्याचा आरोप करुन ‘गोंयचो आवाज’ संघटनेने या प्रकारणाची न्यायालयिन चौकशी करावी अशी मागणी काल पत्रकार परिषदेत करण्यात आली. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकारी आयवा फर्नांडिस यांनी मासळीतील फॉर्मेलिन प्रकरण उघड केले पण असे असतानाही सरकार याकडे गांर्भियाने पहायला तयार नाही असा ठपकाही या संघटनेने ठेवला.

 एफडीए अधिकारी आयवा फर्नाडिस यांनी हे प्रकरण उघड केल्याने आज या प्रशासनाच्या संचालक तसेच मंत्र्याकडून त्यांची सतावणूक सुरु आहे. जे अधिकारी प्रामाणिकपणे आपले काम करत आहे त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. फॉर्मेलिन हा लोकांच्या अरोग्याविषयीचा प्रश्न असल्याने सरकारने या विषयी लोकांचा आरोग्याशी खेळू नये. स्वःताच्या फायद्यासाठी तसेच मासळी दलाल इब्राहीम यांना सहकार्य करण्यासाठी हे प्रकरण दाबले जात आहे. या मंत्र्यांना राज्यातील लोकांचे काहीच पडले sनसून मासळी दलाल इब्राहीम यांची चर्चा करुन त्यांना सांभळण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज लोकांना दाखविण्यासाठी बाहेरील मासळी बंद केली जात आहे. पण या प्राकरणाची सखोल चौकशी केली जात नाही. सरकारने याची न्यायलान चौकशी करुत  अधिकाऱयांची सतावणूक थांबवावी नाहीतर ही संघटना रस्त्यावर उतरणार आहे, असे यावेळी या संघटनेचे कॅप्टन विरीयाटो फर्नांडिस यांनी सांगितले.

 फॉमेर्लिन हा विषय अनेक वर्षापासून सुरु आहे. सर्व सरकारमधील राजकरण्यांनी गोव्याच्या जनतेची फसवणूक केली आहे. आज गोव्यात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. मुख्यमंत्र्यांनाही कॅन्सर झाल आहे. गोव्यात मिळणारी चांगली मासळी निर्यात केली जाते व गोवेकरांना फॉमेर्लिनयुक्त मासळी देण्यात येत होती. गोव्यात मासळी संर्वधनासाठी कोल्ड स्टोरेज अजून सरकारने बांधलेले नाही. त्यामुळे हे सरकार या विषयी गंभिर नाही हे दिसून येत आहे. आता गोव्यातील सर्व संघटनांनी या गंभिर अशा समस्याविषयी आवाज उठविणे गरजेचे आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी होणे गरजेच आहे, असे यावेळी ‘रिओलशनरी गोवन’ या संघटनेचे मानोज यांनी सांगितले.

 यावेळी ‘गोंयचो आवाज संघटनेच्या झरिना, इनासियो वाझ, जुझे मारिया मिरांड यांनीही याविषयी सरकारवर आरोप केले.