|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » उद्योग » शॉर्ट टर्म इन्कम फंडाचा विचार

शॉर्ट टर्म इन्कम फंडाचा विचार 

प्रतिनिधी /पुणे :

भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदारात वाढ करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केल्याने कमी कालावधीचा विचार करता उत्पन्नातील स्थिरता व उच्च ऍप्रुअल यातून फायदा मिळण्यासाठी शॉर्ट टर्म इन्कम फंडाचा गुंतवणूकदार विचार करीत असल्याचे समोर आले आहे.

‘यूटीआय शॉर्ट टर्म इन्कम फंडा’चे फंड मॅनेजर सुधीर अग्रवाल म्हणाले, आगामी आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सीपीआय महागाई 5 टक्क्याच्या दिशेने जाण्याची अपेक्षा असताना महागाई विशिष्ट प्रमाणापर्यंत नियंत्रित करण्याचा दबाव आरबीआयवर असू शकतो. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्याने आयातीचा खर्च वाढला असल्याने येत्या काही तिमाहीत सीपीआयसंबंधी जोखीम वाढू शकते. अशा स्थितीत गुंतवणूकदारांनी शॉर्ट टर्म इन्कम फंडांकडे वळण्यास सुरुवात करावी. कारण, हे फंड हाय ऍप्रुअल व कमी चढ-उतार असणारे आहेत. गुंतवणूकदारांनी 1 ते 3 वर्षे गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवून, आमच्या शॉर्ट टर्म इन्कम फंडांचा विचार करावा.

यूटीआय शॉर्ट टर्म इन्कम फंडाने सातत्याने क्रिसिल शॉर्ट-टर्म बाँड फंड इंडेक्स या बेंचमार्कपेक्षा सरस कामगिरी केली आहे. फंडाने स्थापनेपासून 8.57… परतावा दिला आहे, तर बेंचमार्कने दिलेला परतावा 7.56… आहे