|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Top News » अहमदनगर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित

अहमदनगर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित 

पुणे / प्रतिनिधी :

राज्य निवडणूक आयोगाने अहमदनगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. 9 डिसेंबरला मतदान, तर 10 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर पासून आचारसंहिता जारी करण्यात आली आहे.

मागील निवडणुकीत निवडून आलेल्या महापालिकेतील सदस्यांचा कार्यकाळ 29 डिसेंबर रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 3 लाख 46 हजार 755 आहे, तर मतदारांची संख्या सुमारे 2 लाख 56 हजार 719 आहे. एकूण 17 प्रभागांतील 68 जागांसाठी मतदान होईल. त्यांपैकी 34 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जातींसाठी 9, अनुसूचित जमातींसाठी 1, तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 18 जागा राखीव आहेत.

महापालिकेसाठी 13 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात होईल. 9 डिसेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 10 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे.

निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी अर्ज दाखल करणे : 13 ते 20 नोव्हेंबर

अर्जांची छाननी : 22 नोव्हेंबर

अर्ज मागे घेण्याची मुदत : 26 नोव्हेंबर

चिन्हवाटप : 27 नोव्हेंबर

मतदान : 9 डिसेंबर

मतमोजणी : 10 डिसेंबर