|Saturday, February 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » काश्मीर महाराजांच्या कारचा ब्रिटनमध्ये होणार लिलाव

काश्मीर महाराजांच्या कारचा ब्रिटनमध्ये होणार लिलाव 

लंडन :

काश्मीरचे अखेरचे राजे हरिसिंग यांच्या एका दुर्मीळ व्हिंटेज कारचा डिसेंबर महिन्यात लंडनमध्ये लिलाव होणार आहे. बोनहेम्स बाँड स्ट्रीट सेलच्या 2 डिसेंबर रोजी होणाऱया लिलावात गतकाळातील उत्कृष्ट ब्रिटिश कार्सपैकी एक असलेल्या 1924 च्या वॉक्सहॉल 30-98 ओई वेलोक्स टूररची विक्री होणार आहे. ही आकर्षक कार 3.25 कोटी रुपयांपासून (3,30,000 पौंड) 3 कोटी 70 लाख रुपयांच्या (3,90,000 पौंड) किमतीत लिलावात विकली जाऊ शकते. या कारमध्ये हरिसिंग यांनी स्वतःच्या आवडीनुसार बदल केले होते तसेच अतिरिक्त सुविधा जोडल्या होत्या यामुळे ही कार अनोखी असल्याचे तज्ञांचे मत आहे.हरिसिंग हे जम्मू-काश्मीरचे अंतिम शासक महाराज होते. ते राजा अमर सिंग यांचे कनिष्ठ पुत्र होते. जम्मू-काश्मीरची राजगादी त्यांना महाराजा प्रताप सिंग यांच्याकडून वारशादाखल मिळाली होती. हरिसिंग हे डोगरा शासनाचे अंतिम राजे होते. राज्यसभेचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री कर्णसिंग हे राजा हरिसिंगचे पुत्र आहेत.

 

Related posts: