|Monday, February 24, 2020
You are here: Home » Top News » अण्णाभाऊ साठे महामंडळ पुन्हा सुरू करण्याची मागणी

अण्णाभाऊ साठे महामंडळ पुन्हा सुरू करण्याची मागणी 

पुणे / प्रतिनिधी :

अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास मंडळ त्वरीत सुरू करावे. अन्यथा, त्याचे परिणाम येत्या निवडणुकीत दिसून येतील, असा इशारा अण्णाभाऊ साठे यांचे नातू व मानवहित लोकशाही संघटनेचे सचिनभाऊ साठे यांनी शुक्रवारी येथे केला.

याबाबत बोलताना साठे म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास मंडळ बंद करण्यात आल्याने राज्यातील मातंग समाजाच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग पूर्णतः बंद झाला आहे. भ्रष्टाचार फक्त महामंडळातच झाला आहे काय? निरव मोदी, विजय मल्ल्या आदी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करून पळून गेले. म्हणून बँका बंद झाल्या आहेत का? मग फक्त अण्णाभाऊ साठे महामंडळच बंद का करण्यात आले आहे, असा सवाल त्यांनी केला.

राज्यात दलितांवरील होणारे अन्याय, अत्याचार ही व्याख्या आता बदलत असून, मोठय़ा प्रमाणात मातंग समाजावर हल्ले होत आहेत. त्यामुळे राज्यातील मातंग समाजाच्या संघटनांनी एकत्र येऊन आपली राजकीय भूमिका मांडली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या वेळी गणेश भगत, अनिल सरोदे, रवींद्र खैरनात आदी उपस्थित होते.

Related posts: