|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » पद्मिनी कोल्हापुरेंच्या वाढदिवशी तारे-ताराकांची उपस्थिती!

पद्मिनी कोल्हापुरेंच्या वाढदिवशी तारे-ताराकांची उपस्थिती! 

मुंबई / प्रतिनिधी :

अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेंचा 1 नोव्हेंबर रोजी 53 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या परिवारासह चित्रपटसृष्टीतील मान्यवरांची खास उपस्थिती लाभली होती. 1980- 90 चा पडदा व्यापून टाकणाऱया या गुणी अभिनेत्रीचा प्रवास अखंड सुरु आहे. सध्या त्या आशुतोष गोवारीकरांच्या हिंदी महत्वकांशी ‘पानिपत’ मध्ये तर मराठीत शशांक उदापूरकरांच्या ‘प्रवास’ चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका करीत आहेत.

या मराठमोळय़ा अभिनेत्रीने हेवा वाटावा असं यश हिंदी चित्रपटसृष्टीत कमावलं आहे. तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनिल कपूर, बोनी कपूर, पूनम ढिल्लों, शक्ती कपूर, शिवानी कपूर, श्रद्धा कपूर, सिद्धांत कपूर, तेजस्विनी कोल्हापुरे, मुलगा प्रियांक व पती प्रदीप(टूटू) शर्मांसह दिग्गज मंडळी उपस्थित होती.

पद्मिनी कोल्हापुरेंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याची भाची अर्थात आजची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूरने हिरीरीने सहभाग घेतला होता. तिचा उत्साह दांडगा होता. या विषयी ती सांगते, पद्मिनी मावशी तिच्या आवडत्या अभिनेत्रींनपैकी एक आहेत. तिचा अभिनय पहाताच आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत. मावशीची हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष जागा आहे. पद्मिनीची बहीण शिवांगी आणि शक्ती कपूर यांना श्रद्धा आणि सिद्धांत हि त्यांची मुले आहेत. आणि ते दोघेही चित्रपटसृष्टीत व्यस्त असून लवकरच पद्मिनी कोल्हापुरे आणि तिचे पती प्रसिद्ध निर्माते प्रदीप(टूटू) शर्मा यांचा मुलगा प्रियांक हाही हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. अभिनेत्री तेजस्विनी हि पद्मिनीची लहान बहीण असून तिच्या छोटय़ मुलीसह तीही या सोहळय़ात सहभागी झाली होती.