|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » डिएड प्रशिक्षित शिक्षकांवर होतोय अन्याय

डिएड प्रशिक्षित शिक्षकांवर होतोय अन्याय 

प्रतिनिधी/ पणजी

राज्यातील डिएड प्रशिक्षित शिक्षकांवर अन्याय होत आहे. प्राथमिक शिक्षक भरती दरम्यान आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावू असा इशार डिएड प्रशिक्षित शिक्षक संघटनेने दिला आहे. प्राथमिक शाळांतील शिक्षक पदांसाठी बिएड व उच्चशिक्षित उमेदवारांची निवड होत असल्याने डिएड केलेल्या उमेदवरांनी काय करावे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

काल शनिवारी डिएड प्रशिक्षित शिक्षण संघटनेने पणजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्वाती केरकर बोलत होत्या त्यांनी वरील माहिती दिली आहे. त्यांच्या सोबज दिपाली कुमार तसेच डिएड प्रशिक्षित शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. गोवा शिक्षण खात्याने काही दिवसापूर्वी प्रथमिक शाळांसाठी 182 शिक्षकांची भरती करणार असल्याची जाहिरात प्रसिध्द केली होती. वास्तविक या पदांसाठी डिएड प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांची आवश्यकता आहे. मात्र या पदांसाठी बिएड व उच्चशिक्षित उमेदवरांनीही तसेच जे खाजगी विद्यालयांत नोकरी करीत आहे तसेच काही पॅरा शिक्षक म्हणून काम करीत आहेत त्यांनीही अर्ज केले आहेत असे स्वती केरकर यांनी सांगितले.

बिएड व उच्चशिक्षित उमेदवारांची प्राथमिक शाळ शिक्षक म्हणून निवड केल्यास केवळ डिएड करून नोकरीची वाट पाहत बसलेल्या उमेदवारांचे काय होईल असा प्रश्न उपस्थित झाला आहे. म्हणून डिएड प्रशिक्षित शिक्षक संघटनेने शिक्षण संचाल मराठे यांची भेट घेऊन त्यांच्या समोर हा मुद्दा मांडला होता. त्यावेळी शिक्षण संचावकांनी केवळ डिएड प्रशिक्षित उमेदवारांनाच प्रधान्य दिला जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी अर्ज दाखल केलेल्या बिएड व उच्चशिक्षित उमेदवारांसह सर्वानाच लेखी परिक्षेसाठी उपस्थित रहाण्याचे कळविल्याने डिएड प्रशिक्षित शिक्षकांवर अन्याय होणार यात शंकाच नसल्याचे दिसून येत आहे. कारण बिएड व उच्च शिक्षित उमेदवार लेखी परिक्षेत पास झाल्यास त्यांना कसे काय नाकारतील असा प्रश्न उपस्थित होणार असून पर्यायाने डिएड प्रशिक्षित शिक्षंकावर अन्याय होणार आहे असेही केरकर यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षावासून राज्य सरकार एका मागून एक अशी बिएड प्रशिक्षण केंद्र सुरु करीत आहेत. ज्या लोकांची उच्च शिक्षण घेण्याची आर्थीदृष्टय़ ऐपत नसते किंवा अन्य कोणत्या कारणामुळ उच्च शिक्षण घेऊ शकत नाही असे विद्यार्थी विद्यार्थीनी अधिकतर बारावी झाल्यानंतर बिएडचे प्रशिक्षण घेत असतात जेणेकरून लवकर नोकरी मिळेल आणि आर्थीक प्रश्न सुटेल मात्र ज्या पदांसाटी डिएड उमेदवारांची गरज आहे त्याजागी बिएड वउच्च शिक्षित उमेदवारांनी घेऊ लागले तर डिएड झालेल्यानी काय करावे. ज्या अधिकतरी बिएड झालेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेस येण्यास पत्र पाठविले आहे ते अधिकाधिक वास्को चिखली भागातील आहेत. त्यांच्या आडनावे पाहिल्या ते खरोखरच गोमंतकीय आहेत की नाही हाही एक प्रश्न उपस्थित होत आहे. 15 वर्षाचा रहिवासी दाखला मिळाकी गोमंतकीय होतो हे जरी खरे असले तरी मराठी शाळांना शिक्षक निवड होत असल्याचे भान राखणे जरूरीचे आहे असेही केरकर यांनी सांगितले.

Related posts: