|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » महाराष्ट्राला माहित नसलेले सम्राट शिवाजी’ ग्रंथाचे लवकरच प्रकाशन

महाराष्ट्राला माहित नसलेले सम्राट शिवाजी’ ग्रंथाचे लवकरच प्रकाशन 

प्रा.डॉ. आनंद पाटील लिखित ग्रंथाची महाराष्ट्राला उत्सुकता

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तुलनाकार प्रा. डॉ.  आनंद पाटील लिखित ‘महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी’ ग्रंथाची पहिली प्रत रायगडावरील सम्राट शिवाजी व राजमाता जिजाऊ यांच्या समाधीवर अर्पण करण्यात आली.  डॉ. पाटील व आनंद ग्रंथसागर प्रकाशनचे संचालक डॉ. मंगेश पाटील यांच्या हस्ते ग्रंथ अर्पण करण्यात आला.

 डॉ. पाटील यांच्या ’महाराष्ट्राला माहीत नसलेली सम्राट शिवाजी’ या ग्रंथाबद्दल महाराष्ट्रात उत्सुकता आहे. बखरी, सनावळ्या यांचा आधार न घेता ग्रंथ साकारला आहे. तुलनात्मक संस्कृतिक प्रतिमा अभ्यास प्रकारचा हा पहिलाच ग्रंथ आहे. त्यात बहुसंख्य पाश्चात्य शोध प्रबंधांचा आधार घेतला असून, शिवरायांची सम्राट ही प्रतिमा प्रथमच केंद्रस्थानी आणली आहे. शिवरायांबद्दलचे जागतिक इतिहासातील संदर्भ प्रथमच मराठीत या ग्रंथाद्वारे आले आहेत.  प्रसिद्ध प्रगतशील इतिहासातील प्रगत सिद्धांत लागू केल्याने मांडले गेले आहेत. या ग्रंथातील काही मजकूर सोशल मीडियावर मालिकेद्वारे प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यावर सांस्कृतिक विचार प्रबोधन घडविणारा हा ग्रंथ असल्याची प्रतिक्रिया अनेक जाणकारांनी व्यक्त केली आहे. 

 या ग्रंथाचे प्रकाशन लवकरच होत असून संपूर्ण महाराष्ट्रात अल्प किमतीत उपलब्ध होत आहे. हा ग्रंथ सम्राट शिवाजी व राजमाता जिजाऊ यांच्या समाधीवर नुकताच अर्पण करण्यात आला. यावेळी कामेरी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील कर्मवीर शिक्षण संस्थेच्या वतीने शंभर प्रतींच्या आगाऊ नोंदणीचा दहा हजार रुपयांचा धनादेश प्रा. अनिल पाटील यांनी डॉ. पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.

याप्रसंगी मोडी तज्ञ वसंत शिंगण, प्रा. अनिल पाटील, अभिजीत जाधव, प्रसाद पाटील  उपस्थित होते.