|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पक्ष वाचविण्यासाठी भाजप संघटनेतबदलाचे धोरण हाती घ्या

पक्ष वाचविण्यासाठी भाजप संघटनेतबदलाचे धोरण हाती घ्या 

प्रतिनिधी/ म्हापसा

ठरल्यानुसार अखेर म्हापशाचे आमदार तथा माजी नगरविकासमंत्री ऍड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या निवासस्थानी माजीमंत्री दयानंद मोंद्रकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, अनंत शेट, माजी मंत्री महादेव नाईक यांनी ऍड. डिसोझा याची भेट घेऊन सुमारे अडिच तास चर्चा केली. या बैठकीच्या दरम्यान, राज्याच्या आजच्या परिस्थितीला प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर कारणीभूत असून त्यांनी त्याबद्दल पायउतार व्हावे, अशी मागणी झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पक्ष वाचविण्यासाठी संघटनेत बदलाचे धोरण हाती घेणे आवश्यक आहे, अशी माहिती पार्सेकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

गुरुवारी संध्याकाळी ऍड. डिसोझा यांच्या निवासस्थानी…. बैठक घेतली माजी सभापती राजेंद्र आर्लेकर परगावी गोल्याने ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही.

पक्ष संघटनेत बदल व्हावा अशा या नेत्यांबरोबर पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. हे पक्षाच्या कार्य पद्धतीवर कार्यकर्ते नाराज आहेत. मंत्र्याना वगळलेले. तेव्हा या निर्णयानी काहीच संबंध नाही. आणि काँग्रेसच्या दोन आमदारांना पक्षप्रवेश दिला. तेव्हा पक्षाच्या अध्यक्षाचा हा निर्णय असल्याचे सांगून तेंडुलकर यांना प्रदेशाध्यक्षपदासाठी ते योग्य नाहीत हे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना पद सोडणेच योग्य आहे. आम्ही पक्षाच्या हितासाठीचे बोलत आहोत. विद्यमान संघटना बरखास्त करुन गोव्यात पक्षाची पुनबांधणी करण्याची गरज आहे. असे पार्सेकर यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याबद्दल बोलताना पार्सेकर यांनी टाळले. मात्र प्रशासनात ………. झाला पाहिजे असे ते म्हणाले. हि बैठक आपण बोलावली नाही. लक्ष्मीपूजनावेळी गाभा समितीचे नरेंद्र सावईकर व संजीव देसाई आपल्या घरी आले होते. त्यांनी आपणाकडे भेटण्याची वेळ मागितली. मात्र आपण व्यस्त असल्याने नंतर भेटू असे सांगितले.

भाजपच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी झटने : महादेव नाईक

भाजपच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी आपण लक्ष केंद्रीत करणार असल्याचे माजी मंत्री महादेव नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. पक्षात राहू किंवा निवडणूक लढवू याबाबतचा निर्णय स्पष्ट करणत येईल. असे महादेव नाईक म्हणाले.

Related posts: