|Saturday, February 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » कच्च्या तेलाच्या स्वस्ताईने पेट्रोल-डिझेल दर उतरणार

कच्च्या तेलाच्या स्वस्ताईने पेट्रोल-डिझेल दर उतरणार 

वाहनधारकांना दिलासा : कच्चे तेल 70 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत घसरले : पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर 17 पैशांची घसरण

लंडन, नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 70 डॉलरपेक्षाही खाली आले आहेत. एप्रिल 2018 नंतर पहिल्यांदाच अशी निचांकी स्थिती निर्माण आहे. त्यामुळे नजिकच्या काळात पुन्हा इंधन दरात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर घसरत आहेत. त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा 17 पैशांची घसरण झाली आहे. कच्च्या तेलाचे दर 6 टक्क्यांनी तर उच्च प्रतीचे कच्चे तेल 4 टक्क्यांनी घसरले आहे. त्यामुळे अनुक्रमे 60.50 व 70 डॉलर प्रतिबॅरलच्या आसपास हे दर आले आहेत. स्थानिक बाजाराचा विचार केला तर कच्च्या तेलाचा नोव्हेंबर करारानुसार 0.30 टक्क्यांच्या घसरणीसह 4 हजार 418 रुपयांवर आला आहे.

कच्च्या तेलाच्या प्रमुख उत्पादक देशांची अबुधाबी येथे शुक्रवारी होणाऱया बैठकीपूर्वीच कच्चे तेल 70 डॉलर प्रतिबॅरलवर आल्यामुळे इंधन दरात काहीसा दिलासा मिळाला आहे. लंडनमध्ये झालेल्या करारात कच्चे तेल (उत्तर सागर) जानेवारीच्या वितरणानुसार 69.69 डॉलर प्रतिबॅरल झाले आहे. अमेरिकेमध्ये तेल साठा वाढल्याच्या कारणाने कच्च्या तेलात ही घसरण झाली आहे.

दरम्यानच्या सप्ताहात ओपेक आणि गैर-ओपेकमधील प्रमुख कच्चे तेल उत्पादक देश किंमतीतील घसरणीच्या मुद्यावर तसेच उत्पादनात संभाव्य होणाऱया घसरणीवर चर्चा करण्यासाठी अबुधाबीत बैठक होणार आहे. इराणच्या कच्चे तेल निर्यातीवर अमेरिकेने बंदी घातल्याने घसरण सुरू आहे. परिणामी अमेरिकेच्या 8 मोठय़ा खरेदीदारांना या बंदीची सवलत देण्यात आली आहे. अमेरिकेने सौदी अरब आणि रशियाचे कच्चे तेल उत्पादनात पहिल्यांदा 3.3 कोटी बॅरल असलेला दररोजच्या स्तराचा टप्पा पूर्ण केला आहे.

 

कच्च्या तेलाचा साठा भारत वाढवणार…

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत होत असलेल्या घसरणीमुळे भारत कच्च्या तेलाची साठवण क्षमता वाढवणार आहे. फेज 2 क्षमतेत 6.5 मिलियन मेट्रीक टन पीपीपी मॉडेलनुसार कच्च्या तेलाचा जादा साठा करण्यात येणार आहे. आईएसपीआरएल ओडिशातील तेल गोदामामध्ये 4 मिलियन मेट्रीक टन जमिनीत कच्चे तेल साठवण केले जाणार आहे. तर कर्नाटकच्या पादुरमध्ये 2.5 मिलीयन मेट्रीक टन कच्चे तेल साठवण करण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी अंदाजे 11 हजार कोटी रुपयाच्या खर्चाची तरतूद करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आईएसपीआरएलने विशाखापट्टणममध्ये 1.33 मिलियन मेट्रीक टन, मंगळूरमध्ये 1.5 मिलियन मेट्रीक टन आणि कर्नाटकच्या पादूरमध्ये 2.5 मिलियन मेट्रीक टन कच्चे तेलाच्या साठवणीचे काम सुरू होणार आहे. आईएसपीआरएलच्या पहिल्या टप्प्यात तयार होणाऱया साठवणची क्षमता 10 दिवसांची आहे.

 

Related posts: