|Monday, February 17, 2020
You are here: Home » क्रिडा » बांगलादेश-झिंबाब्वे दुसरी कसोटी आज पासून

बांगलादेश-झिंबाब्वे दुसरी कसोटी आज पासून 

वृत्तसंस्था/ ढाका

यजमान बांगलादेश आणि झिंबाब्वे यांच्यातील दुसऱया कसोटी सामन्याला येथे रविवारपासून प्रारंभ होणार आहे. उभय संघात दोन सामन्यांची ही कसोटी मालिका खेळविली जात असून झिंबाब्वेने या मालिकेत पहिली कसोटी 151 धावांनी जिंकून आघाडी घेतली आहे.

पहिल्या कसोटीत बांगलादेशची कामगिरी चांगली झाली नाही. झिंबाब्वेने चौथ्या दिवशीच ही कसोटी एकतर्फी जिंकली. या दुसऱया कसोटीत बांगलादेशचा संघ चांगली कामगिरी करून ही मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया बांगलादेशचा कर्णधार रियादने व्यक्त केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अलिकडच्या कालावधीत बांगलादेशला सलग आठ कसोटी डावामध्ये 200 धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. झिंबाब्वेचा संघ ही कसोटी मालिका एकतर्फी जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. बांगलादेशने अलीकडेच झिंबाब्वे विरूद्धची वनडे मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली आहे.

Related posts: