|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कुडतरी आरोग्य केंद्रात रक्त तपासणीसाठी येणाऱया रूग्णांचे हाल

कुडतरी आरोग्य केंद्रात रक्त तपासणीसाठी येणाऱया रूग्णांचे हाल 

प्रतिनिधी/ मडगाव

कुडतरी आरोग्य केंद्रात दररोज किमान 25 ते 30 रूग्ण रक्त तपासणीसाठी येतात, पण या ठिकाणी कर्मचाऱयांची संख्या कमी असल्याने, या रूग्णांचे हाल होत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. सरकारने या ठिकाणी आवश्यक असलेल्या कर्मचाऱयांच्या जागा त्वरित भरण्याची मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.

सकाळी 7 वाजल्यापासून रूग्ण या ठिकाणी रक्त तपासणीसाठी येतात, त्यात बहुसंख्य रूग्ण हे मधुमेही असतात, त्यांची वेळीच तपासणी होणे आवश्यक असताना देखील त्याला विलंब लागत असल्याबद्दल आम आदमी पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सकाळी 7 वाजता आलेल्या रूग्णांची प्रत्यक्षा 9.15 वाजता रक्त तपासणी केली जाते. आरोग्य खात्याचा हा प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचे मत आम आदमी पक्षाने व्यक्त केले आहे.

या ठिकाणी कर्मचाऱयांची संख्या अपुरी असल्याने रूग्णांना रक्त तपासणी प्रतीक्षा करावी लागते. या रिक्त जागा भराव्यात यासाठी खात्याला अनेकवेळा कळविण्यात आले. परंतु खात्याने या कामी पुढाकार घेतला नसल्याची माहिती येथील आरोग्याधिकारी मार्टिना फर्नांडिस यांनी दिली. आरोग्य केंद्रात अपुरा कर्मचारी वर्ग असताना देखील सद्या जे कर्मचारी आहेत. ते चांगली सेवा देत असल्याची माहिती रूग्णांनी तसेच आरोग्याधिकारी मार्टिना फर्नांडिस यांनी दिली.

आमदार रेजिनाल्डच्या कार्यालयात रक्त काढले जाते

रक्त तपासणीसाठी आवश्यक असलेले रूग्णांचे रक्त, दररोज सकाळी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या कार्यालयात बेकायदेशीररित्या काढले जाते. हे रक्त नंतर आरोग्य केंद्रात तपासणीसाठी पाठवून दिले जाते. हा प्रकार खुपच गंभीर असून आरोग्य केंद्र सोडून आमदाराच्या कार्यालयात कसे काय रूक्त काढले जाते असा सवाल देखील आम आदमी पक्षाने उपस्थित केला आहे.

सरकार व काँग्रेसचे आमदार यांचे लागेबांधे असल्यानेच अशा गोष्टी घडत असल्याचा आरोप देखील आम आदमी पक्षाने केला आहे. सरकारने हे प्रकार त्वरित बंद करावे व लोकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. दिल्लीत आम आदमीच्या सरकारने प्रत्येक गावात वैद्यकीय सुविधा उलपब्ध करण्यात आल्या असून रूग्णांना मोफत औषधे दिली जातात, त्याच धर्तीवर गोव्यात सरकारने प्रत्येक गावात वैद्यकीय सुविधा सतेच मोफत औषधे पुरावी अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.

आरोग्याधिकाऱयाची त्वरित बदली

दरम्यान, आरोग्याधिकारी मार्टीना फर्नांडिस यांनी कर्मचाऱयांच्या रिक्त जागा भरलेल्या नाहीत तसेच एकूण आरोग्य केंद्रा संबंधी माहिती उघड केल्याने, त्याची त्वरित कासावली येथे बदली करण्यात आली तर त्यांच्या जागी डॉ. वल्लभ कुलकर्णी यांची नियुक्त करण्यात आली आहे.

Related posts: