|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जानवलीत रिक्षाचालकाची आत्महत्या

जानवलीत रिक्षाचालकाची आत्महत्या 

वार्ताहर / कणकवली:

घराच्या बाजूच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेत रिक्षाचालक जयेश सुनील राणे (22, जानवली-वाकाडवाडी) या युवकाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. सुनील रात्री घरी जेवण्यासाठी आला नसल्याने रात्री दहाच्या सुमारास त्याच्या कुटुंबियांनी शोधाशोध केली असता घराच्या परिसरातील झाडाला गळफास घेत त्याने आत्महत्या केल्याचे दिसून आले. याबाबत कणकवली पोलिसांत जयेश याचे चुलते चंद्रशेखर बाजीराव राणे यांनी खबर दिली आहे. पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. जयेश याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, चुलते असा परिवार आहे.

Related posts: