|Sunday, June 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » युद्धपर्यटनाच्या कल्पनेला मिळतेय मोठे बळ

युद्धपर्यटनाच्या कल्पनेला मिळतेय मोठे बळ 

युद्धग्रस्त क्षेत्रांना पर्यटकांची पसंती   संख्या दिवसेंदिवस वाढतेय

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क 

युद्धपर्यटनाला जगात वेगाने प्रसिद्धी मिळत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पर्यटन कंपन्या इराक, सोमालिया, सीरिया आणि इस्रायल यासारख्या संघर्ष क्षेत्रांमध्ये पर्यटनासाठी विशेष पॅकेज उपलब्ध करत आहेत.  अशाप्रकारच्या पर्यटनासाठी 5 ते 14 दिवसांकरता तुम्हाला 3500 डॉलर्स (2,53,680 रुपये) पासून 20 हजार डॉलर्स (14,49,600 रुपये) खर्च करावे लागू शकतात. कंपन्या या पॅकेजमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष युद्ध किंवा संघर्षक्षेत्रात नेत असतात.

मागील एक दशकात युद्धपर्यटनाने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. विशेषकरून पाश्चिमात्य देशांमध्ये युद्धपर्यटन वेगाने जोर पकडू लागले आहे. लोक आता चित्रपटाच्या पडद्यावरून किंवा पुस्तकांमधून बाहेर पडत प्रत्यक्ष घडामोडी पाहू इच्छित आहेत. पर्यटकांनी आता युद्धक्षेत्राला भेट देण्याचे सत्र आरंभिले आहे.

युद्ध पर्यटनाचे चित्र

पत्रकार ऍलन सोरेनसेन यांनी युद्धपर्यटनाशी संबंधित एक छायाचित्र ट्विट केले होते. हे छायाचित्र इस्रायलच्या स्डेरॉट शहराचे आहे. येथील एका टेकडीवर पर्यटक इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेले युद्ध पाहण्यासाठी रात्रीच्या वेळी पोहोचल्याचे यात दिसून येते. या टेकडय़ा युद्धपर्यटनासाठी प्रसिद्ध झाल्या असून त्यांना स्डेरॉट सिनेमा असे नाव देखील पडले आहे. 2014 पर्यंत 50 लाखांहून अधिक जणांनी या टेकडय़ांवरून युद्धाचे दृश्य पाहिले आहे. या पर्यटकांमध्ये युवती तसेच वृद्धांचा देखील समावेश आहे.

बगदाद : बगदाद एकेकाळी मध्यपूर्वेतील सर्वात सुंदर शहर होते. परंतु अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाने या शहराचा चेहराचा बिघडविला आहे. येथे सरकारी सैन्य आणि बंडखोर यांच्यात मोठा संघर्ष झाला आहे.

दमास्कस : हे शहर सीरियाची राजधानी असून येथे देखील सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये दीर्घकाळापासून युद्ध सुरू आहे. याला जगाच्या नागरीयुद्धाची राजधानी असे देखील म्हटले जाते.

मोगादिशू : हे शहर सोमालियाची राजधानी असून याला जगाचे सर्वात धोकादायक शहर मानले जाते. 1991 नंतर पासून येथे कोणतेही स्थिर सरकार राहिले नाही. युद्धापूर्वी याला ‘व्हाइट पर्ल ऑफ दी इंडियन ओशन’ नावाने ओळखले जायचे.

गाझा : येथे इस्रायलचे सैन्य आणि हमास यांच्यात दीर्घकाळापासून युद्ध सुरू आहे. इस्रायलने येथील मोठय़ा भूभागावर नियंत्रण मिळविले असल्याने हमासने येथे हिंसक संघर्ष चालविला आहे.

जोंगलेई : येथे दीर्घकाळापासून मुर्ले आणि लो नुएर या समुदायांमध्ये हिंसाचार सुरू आहे. 2011 मध्ये येथील संघर्षात 4241 हून अधिक जण मारले गेले होते.

त्रिपोली : हे लीबियाच्या सर्वात सुंदर शहरांपैकी एक होते, परंतु गृहयुद्धामुळे आता हे जगाच्या सर्वात धोकादायक शहरांमध्ये सामील झाले आहे. अमेरिकेच्या सैन्याने मुअम्मर गद्दाफीला ठार केल्यानंतर येथील स्थिती बिघडली आहे.

मध्य आफ्रिकन रिपब्लिक : आफ्रिका महाखंडातील हा देश दीर्घकाळापासून गृहयुद्धाला तोंड देतोय. या संघर्षात लाखोंच्या संख्येत सामान्य नागरिक मारले गेले आहेत.

काबूल : येथेही मागील अनेक वर्षांपासून युद्ध सुरू आहे. तालिबान आणि सैन्य यांच्यात हिंसक संघर्ष सुरू असून शहराच्या पुनउ&भारणीला यामुळे मोठा फटका बसला आहे.