|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » स्किल डेव्लपमेन्ट योजनेला मार्गदर्शनाचा अभाव

स्किल डेव्लपमेन्ट योजनेला मार्गदर्शनाचा अभाव 

19 टक्के महिलांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला : 15 ते 30 वयोगटातील 6 हजार युवकांचा सर्व्हे

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

भारत सरकारकडून राबवण्यात आलेल्या स्किल डेव्हलपमेन्ट योजनेच्या संदर्भात देशांतील 70 टक्के युवकांना माहितीच समजली नसून 76 टक्के युवकांनी कोणत्याही स्किल डेव्हलपमेन्ट कार्यक्रमात सहभाग नोंदवला नसल्याचे डे थिंक टॅक ऑब्जर्वर रिसर्च फाउडंशन आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या अहवालातून समोर आले आहे.

15 ते 30 वयोगटातील जवळपास 6 हजार युवकांचा सर्व्ह करण्यात आला असून यात शिक्षण, रोजगार, आणि महत्वकांक्षा असणाऱया योजनासंदर्भात असणारे प्रश्न विचारण्यात आले असता त्यातून युवकांचा सरकार आणि उद्योग क्षेत्रांशी तितकासा ताळमेळ आला नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

एकूणच या अहवालाची मांडणी करत असताना 19 टक्के महिला आणि 26 टक्के पुरुष इतक्या प्रमाणामध्येच कोणत्याना कोणत्या स्किल डेव्हलपमेन्ट कार्यक्रमात आपला सहभाग नेंदवला आसल्यची माहिती देण्यात आली आहे. तर यात वेळेच्या अभावामुळे अशा कार्यक्रमात सहभागी होत येत नसल्याचे मत महिला वर्गाने यावेळी व्यक्त केले आहे.

मार्गदर्शनाचा अभाव..

स्किल डेव्हलपमेन्ट कार्यक्रमाअंर्गत कोणत्या ठिकाणी रोजगार उपल्बध होतात, यासाठी कोणत्या योग्य मार्गाचा उपयोग करावयाचा या संदर्भात योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याच्या अभावामुळेच 51 टक्के युवक व्यावसायिक मार्गदर्शनच्या प्रतिक्षेत आहेत. तर 34 टक्के युवक नाही शिक्षण घेतात नाही रोजगार करतात ते असेच मोकळे फिरत असल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून सांगण्यात आले आहे.

 

युवकांची मते

मत                       टक्के

योजनेत बदल करावा        86

आपल्या आवडीचा रोजगार           39

कोणताच बदल नको 16

उच्च शिक्षणाचा रोजगार  96