|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बंडीमार्ग समस्या निवारणासाठी गेलेले पथक माघारी

बंडीमार्ग समस्या निवारणासाठी गेलेले पथक माघारी 

प्रतिनिधी / बेळगाव

बंडीमार्ग शेतीमधील डेनेज पाण्याची समस्या निवारणासाठी मनपाची जेट सकिंग मशीन नेण्यात आली. पण साचलेल्या सांडपाण्यामुळे शेतामध्ये चिखल झाला आहे. चिखलात वाहन अडकल्याने समस्येचे निवारण न करताच मनपाच्या आरोग्य विभागाचे पथक माघारी परतले. यामुळे ही समस्या कधी सोडवणार, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

  होसूर येथील शेतामध्ये डेनेज वाहिनी तुंबून पंधरा एकर शेत जमिनीमध्ये सांडपाणी साचून आहे. भातपीक आणि ऊस पिकामध्ये सांडपाणी साचून असल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. भात कापणीसाठी आले आहे, पण सांडपाण्यामुळे भात कापणी करणे मुष्किल बनले आहे. भात कापणीसाठी मजूर मिळत नाहीत. येथील समस्या सोडविण्याची मागणी शेतकऱयांनी केली होती. याबाबत तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध करून शेतकऱयांच्या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर मनपाच्या आरोग्य विभागाने पाहणी करून सोमवारी जेट सकींग मशीनद्वारा समस्येचे निवारण करण्याचा प्रयत्न केला. पण शेतीमध्ये चिखल झाला असून वाहन रुतून बसल्याने तुंबलेल्या डेनेज चेंबरपर्यंत वाहन नेता आले नाही. यामुळे मनपाच्या अधिकाऱयांना अर्ध्यावरूनच परतावे लागले. यामुळे डेनेज समस्या जैसे थे आहे. सदर समस्येचे निवारण करण्यासाठी मनपाच्या पथकाबरोबर नगरसेविका सुधा भातकांडे उपस्थित होत्या. यावेळी मनपाचे पर्यावरण साहाय्यक अभियंते प्रवीण किलारी, प्रशांत भातकांडे, स्वच्छता निरीक्षक, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

 

Related posts: