|Saturday, August 24, 2019
You are here: Home » leadingnews » उर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट

उर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट 

ऑनलाईन टीम/ नवी दिल्ली :

स्वायत्ततेच्या मुद्यावरुन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला तणाव आता संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.गेल्या आठवड्यात गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पंतप्रधन नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली असून या भेटीत केंद्र व रिझर्व्ह बँकेत ज्या मुद्यांवरुन वाद होता त्याबाबत चर्चा झाल्याचे समजते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्जित पटेल हे शुक्रवारी दिल्लीत होते. त्यांनी दिल्लीत पंतप्रधन कार्यालयातील वरिष्ठ  अधिकाऱ्यांची भेट घेतली. यातील एका बैठकीत पंतप्रधन नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. केंद्र व रिझर्व्ह बँकेतील संघर्षानंतर पहिल्यांदाच दोघांची भेट झाली. या भेटीमुळे केंद्र व रिझर्व्ह बँकेतील तणाव कमी होण्याची चिन्हे आहेत. मतभेद असले तरी दोन्ही बाजूंनी चर्चा करणे हे महत्त्वाचे आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. उर्जित पटेल यांनी अर्थमंत्री अरुण जेटलींसोबतही चर्चा केल्याचे वृत्त आहे.