|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Top News » सुपरहिरोंचे जनक स्टॅन ली यांचे निधन

सुपरहिरोंचे जनक स्टॅन ली यांचे निधन 

ऑनलाईन टीम/ मुंबई :

स्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपरहिरोंचे जनक स्टॅन ली यांचे निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. अमेरिकेतील कॉमिक बुक संस्कृतीचे चेहरा म्हणून ओळख असलेल्या स्टॅन ली यांनी सोमवारी एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक वर्षांपासून त्यांना विविध आजारांनी ग्रासले होते

 

28 डिसेंबर 1922 रोजी मॅनहॅटनमध्ये जन्मलेल्या स्टॅन ली यांनी 1961 मध्ये ’द फॅन्टॅस्टिक फोर’सह ’मार्वल कॉमिक्स’ची सुरुवात केली होती. यानंतर त्यात स्पायडर मॅन, एक्स मेन, हल्क, आयर्न मॅन, ब्लॅक पँथर, थोर, डॉक्टर स्ट्रेंज आणि कॅप्टन अमिरेका यांसारख्या सुपरहिरोंचा समावेश करण्यात आला.

 

या व्यक्तिरेखांवर नंतर चित्रपटही बनले, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. मार्वलच्या आतापर्यंतच्या जवळपास सर्वच चित्रपटांमध्ये स्टॅन ली यांनी कॅमियो केला होता. कॉमिक्ससह ली यांनी चित्रपटां®³ाा पटकथाही लिहिल्या. स्टॅन ली यांच्या कॉमिक्सचे चाहते जगभरात आहेत.