|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला, 4 जवानांसह 6 जखमी

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला, 4 जवानांसह 6 जखमी 

रायपूर

 छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा सुरक्षा दलांना लक्ष्य करत हल्ला घडवून आणला आहे. बिजापूर जिल्हय़ापासून काही अंतरावर एक आयईडी स्फोट झाला असून यात बीएसएफचे 4 जवान जखमी झाले आहेत. त्यांच्याबरोबरच एक जिल्हा राखीव दलाचा सदस्य आणि नागरिक जखमी झाला आहे. संबंधित परिसरात या स्फोटानंतर चकमक सुरू झाल्याचे सांगण्यात आले. पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान देखील बिजापुरमध्ये सीआरपीएफ आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली होती.

बिजापुरपासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर आयईडी स्फोट झाला. या स्फोटात 6 जण जखमी झाले असून सर्व जखमींना उपचारासाठी त्वरित बिजापुरच्या रुग्णालयात हलविण्यात आले. तर या हल्ल्याची पुष्टी नक्षलविरोधी मोहिमेचे महासंचालक पी. सुंदरराज यांनी दिली आहे.

Related posts: